सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– “आयुष्याचा खरा शिल्पकार…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
दोन हात – दोन पाय
डोक दिलंय तुम्हाला
डोक्यात मेंदू तल्लख
घडवायचंय स्वत:ला —
*
आपण आपणाला
घडवलं नाही तर
आपोआपच होतो
हाता-पायाचा पत्थर —
*
विचारांच्या छिन्नीने
आचाराला घडवायचं
हातापायांच्या सांध्यांना
जोखडातून सोडवायचं —
*
आपणच असतो मनूजा
आयुष्याचे शिल्पकार
मनावर घेतल्यावरच
हवा तसा देऊ शकतो
आयुष्याला स्व-आकार —
*
येईल कुणी घडवेल मला
वाट पहाणे आहे व्यर्थ
कर्तुत्वाने मोठा होतो
त्याच जगण्यात खराखुरा
सदैव भरला असे अर्थ —
*
अर्थचा अर्थ कसा घ्यावा
ज्याने त्यानेच ठरवावं
आचार ,विचार माणुसकी
अर्थ- खजिन्यात पेरावं —
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈