सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 225
☆ नवीन वर्षा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
सुखसौख्याचे, तोरण दारी ,नवीन वर्षा,
रांगोळीही, सज्ज जाहली,ये उत्कर्षा !
*
हर्षभराने ,सजले अंगण, गंध दरवळे
कडूलिंबही,फुले ढाळितो,धरा हिरवळे!
*
भगवा झेंडा, असा फडकला, भल्या सकाळी ,
चैत्रामधली ,सुरू जाहली, जणू दिवाळी !
*
श्रीरामाच्या, आगमनाने , पावन धरती
स्वागत करण्या, नर्तन करती साऱ्या गरती!
*
नवीन वर्षा, टाळशील का, या संघर्षा,
हिंदुराष्ट्र तू बनविणार ना, भारतवर्षा !
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈