सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– “सृष्टीची गुढी…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
गुढी उभारून सृष्टीनेही
काल साजरा केला पाडवा
नैसर्गिक या गुढीमधे
वेगळाच भासते गोडवा ।।
*
सायंपुजा करून कधी
ही गुढी उतरणार नाही
नवे वर्ष पुढे सरकता
गुढी आपसूक उंच होई ।।
*
फुले पाने वेळू पूजन
निसर्गाचा वाढवी मान
हिंदू धर्म रितीरिवाजात
पंचमहाभूतांचा सन्मान ।।
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈