सौ. वंदना अशोक हुळबत्ते
विविधा
☆ आशा… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
संत गाडगेबाबा म्हणतात ज्याच्या मनात आशा नाही तो जगाचा राजा आशा नसलेली व्यक्ती सापडणे दुर्मिळच. मला तर वाटते माणसाला कळायला लागते तेव्हापासून त्याच्या मनाला आशा चिकटते. आशा करणे वाईट नाही. आशेच्या आहारी जाणे तसेच आशा सोडणे हे दोन्ही वाईट. मनात जर आशेची पालवी असेल आणि त्याला प्रयत्नांची जोड असेल तर अशक्य गोष्ट ही शक्य होऊ शकते आशावाद नेहमी जगायला बळ देतो असतो. आशावाद म्हणजे सकारात्मक ऊर्जा. मनातील विचार नेहमी सकारात्मक ठेवले तर आपले प्रयत्न ही योग्य दिशेने चालू राहतात आणि एक दिवस यशाचे शिखर निश्चित गाठता येते.
कोशिश करने वालों की हार नही होती प्रयत्न करण्यासाठी मात्र मनात प्रबळ इच्छा पाहिजे. म्हणजेच आशा पाहिजे.
आशा संपणे म्हणजे उमेद हरणे आशा संपणे म्हणजे नैराश्य येणे आशा संपणे म्हणजे आत्मविश्वास गमावणे जिथे आत्मविश्वास असतो तिथे अशा कधीच संपत नाही. आशा आहे म्हणून आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास आहे म्हणून आशा आहे.हे चक्र नेहमी माणसाच्या मनात चालू राहिले म्हणजे आत्मविकास होऊन कार्यसिद्धी होते. आत्मविश्वासाला उमेदीची पंख असतील तर ध्येयपूर्ती निश्चित होते आशेचा एक किरण बुडणाऱ्याला आधार देतो. आशा, निराशा जीवनाच्या दोन बाजू आहेत. अपेक्षित गोष्ट झाली नाही की निराशा येथे आणि निराशा आली की आत्मविश्वास कमजोर पडतो. काही वेळेस टोकाचे निराशा येऊन जीवन उध्वस्त होण्याची भीती असते. म्हणून मनामध्ये नेहमी आशा तेवत ठेवली पाहिजे आणि आपला आत्मविश्वास वाढवला पाहिजे.
उषःकाल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





