मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वैशाखात अग्निपुष्प ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? वैशाखात अग्निपुष्प ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भावगीत – वर्ण संख्या 16 यती 8 व्या अक्षरावर) 

केशरांगी बहरल्या तेजोमय पलाशाला 

वैशाखात अग्निपुष्प भासतात जणू ज्वाला ||ध्रु||

*
किती शिकावे शिकावे पळसाचे गुण घ्यावे 

ब्रह्मा विष्णू महेशाने येथे निवासाला यावे 

भेगाळल्या मातीवर बहर फुलांचा आला

वैशाखात अग्निपुष्प भासतात जणू ज्वाला ||1||

*
कधी भासतो तो मला ध्यानस्थ बसला योगी

रणरणतो भास्कर चटके पळस भोगी

वसंतवैभवातला किरिट पलाश झाला

वैशाखात अग्नीपुष्प भासतात जणू ज्वाला ||2||

*

कालीमाता सरस्वती यांच्या पूजेसाठी फुले

विदर्भात वापरती सान थोर आणि मुले

ढाक, टेसू, ब्रह्मपुष्प किती नावे पहा याला

वैशाखात अग्निपुष्प भासतात जणू ज्वाला ||3||

*
ऋतुसंहार हे नाव कालिदासांनी दिलेले

अर्धचंद्रकृती चोच पाकळ्यात वसलेले 

पुष्पे पाहूनच येती पक्षी क्रीडा करण्याला

वैशाखत अग्निपुष्प भासतात जणू झाला ||4||

*
बहुगुणी वैद्यराज शेतकऱ्याचा हा मित्र

सर्वमान्य भोजनास होते मान्य याचे पात्र

चोची पक्षाच्या भासती रंग कुसुंबी फुलाला 

वैशाखात अग्निपुष्प भासतात जणू ज्वाला ||5||

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नावातच सगळं आहे☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ नावातच सगळं आहे ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

टेंभा मिरवायला मराठीचा 

आहे कार्यक्रमांचा सुकाळ,

पण समारंभाला नांव देतांना 

पडे मराठी शब्दांचा दुष्काळ!

*

आंग्ल भाषेचा आधार घेतला

तरच म्हणे हल्ली मराठी कळतं,

मग अशा समारंभाना उगाच 

मिरवणाऱ्यांच पाऊल वळतं!

*
जुने जाणते खरे अभ्यासक 

वंचित राहतात अशावेळी,

प्रयोजकांपुढे आयोजकांची 

बसते चांगलीच दातखिळी!

*
LIT FESTला मराठी प्रतिशब्द

शोधायला घ्या एखादी कॉन्टेस्ट,

जर नाहीच मिळाला कुठे तो 

करा साजरी “अभिजात LIT FEST”

करा साजरी “अभिजात LIT FEST”

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ || भुरळ… || ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? || भुरळ… || ? श्री आशिष  बिवलकर ☆

शोधक या नजरेला,

तुझीच रे आस आहे |

क्षणोक्षणी आहे संगे,

त्याचा मज भास आहे |

*

मागे वळून पाहतांना,

स्वप्नांनी भरलेली वाट |

संपता संपत नाही रे,

आठवणींचा थयथयाट |

*

वावरले होती तुज संगे,

सोडून जगाची रे लाज |

रंगीत स्वप्नांची झालीत,

आसवे कशी रे आज |

*

काय सांगावे कोणास,

जडली होते रे वेडी प्रीत |

हरवलास सोडून वाटेवर,

विखुरले रे प्रणयाचे गीत |

*

काही केल्या उमजेना,

कशाची घातलीस रे भुरळ |

तू जरी नाही सोबतीला,

हृदयात तुझेच स्थान रे अढळ |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सुरंगीचा गंध वारा ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सुरंगीचा गंध वारा ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भावगीत – वर्ण संख्या 16 यती 8 व्या अक्षरावर) 

माझ्या मनात बसला तळ कोकण हा सारा

देवराईत सुटला सुरंगीचा गंध वारा ||ध्रु||

फांदी फांदीवर आली सोनपिवळी तकाकी

सर्प हिच्या संगतीत कोकणचा मेवा चाखी

वसंताच्या स्वागताला सारा फुलला नजारा

देवराईत सुटला सुरंगीचा गंध वारा ||1||

*

सुरंगीची पूजा बांधू आरवली वेतोबाला 

वळेसार देखणासा सजवतो कुंतलाला

नाव सुरंगी बुरंगा चमचम जणू तारा

देवराईत सुटला सुरंगीचा गंध वारा ||2||

*
रवी तळपतो वर खाली सुगंध बहर 

वसंताचं आगमन किती साजरं सुंदर 

अत्तराची खाण आहे कोकणचा हा गाभारा 

देवराईत सुटला सुरंगीचा गंध वारा ||3||

*
घमघम करणारे श्वेत पाकळ्यात तुरे

सुकलेल्या फुलाचाही गंध कुंतलात उरे 

शब्दा शब्दात माळला किती नाजूक हा तारा

देवराईत सुटला सुरंगीचा गंध वारा ||4||

*
मला म्हणते सुरंगी माझ्यावर बोल काही

मधुमासी उमलून मी गं देते नवलाई 

झरझर उतरला शब्द फुलांचा पिसारा

देवराईत सुटला सुरंगीचा गंध वारा ||5||

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “एकच इच्छा“ ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – एकच इच्छा – ? ☆ श्री सुहास सोहोनी

भूतकाळ संपला, अजून

वर्तमान उभा आहे

आर्त भविष्याचं चित्र

डोळ्यांसमोर स्पष्ट आहे….

*

इच्छा एकच या जागेवर

एक झाड रुजून यावं

पानसळीच्या आडोशाला

चिऊताईचं घरटं व्हावं…

🌹

कवी : मेधानुज

प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ || संत उपदेश | बीज अध्यात्माचे || ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? || संत उपदेश | बीज अध्यात्माचे || ? श्री आशिष  बिवलकर ☆

संत उपदेश | बीज अध्यात्माचे | 

कल्याण जगाचे | निरंतर ||१||

*

एक एक शब्द | अर्थ त्याचा जाण |

सुवर्णाची खाण | हाती लागे ||२||

सोसूनिया कळा | जन्म देते माय |

दुधावरी साय | जैसी यावी ||३||

*

संताचे जीवन | जैसे मातेपरी |

निरपेक्ष सारी | अंगी सेवा ||४||

*

आंधळ्याच्या हाती | मार्ग दावी काठी |

तैसी जगजेठी | संतजन ||५||

*

संतांचीया देखी | रंक आणि राव | 

नसे भेदभाव | अंतरीसी ||६||

*

आशिष वंदितो | संताचे वचन |

ज्ञानाचे लोचन | उद्धारासी ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दर्पण… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? दर्पण… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

सृष्टीस मोह झाला

प्रतिबिंब पाहण्याचा

कंठात हार घाली

पितस्वर्ण फुलांचा

*

पाण्यात पाहताना

प्रतिबिंब ती स्वतःचे

पाणीही जाहले स्तब्ध

दर्पण होई जलाचे

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कल्पवृक्ष आहे मोह ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कल्पवृक्ष आहे मोह ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

 (अष्टाक्षरी)

तुला पाहून मनाला

माझ्या पडतो ना मोह

असा सुगंध देणारा

कल्पवृक्ष आहे मोह

*

मोठ्या मोठ्या पानांमध्ये

पांढुरकी छान फुले

येता वाऱ्याची झुळूक

झुबक्यात पहा खुले

*

रात्री उमलती सारे

किती झाडाखाली सडे

आदिवासींचा हा देव

सदा उपयोगी पडे

*

तेल बनतेच याचे

औषधेही बनतात

फळफुल पान सारे

उपयोगी गणतात

*

फुले लागतात गोड

प्राणी पक्षी खाती सारे

माणसाला झिंग चढे

मोहाचे या रंग न्यारे

*

खीर रोट बनवती

आदिवासी खाण्यासाठी

पर्यावरण राखतो

हवा शुद्ध देण्यासाठी

*

नावातच मोह आहे

मद्य बनते फुलांचे

आज मोहाचे केले मी

काव्यातून गाजेवाजे

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ समाधिस्थ काया… तेजोमय ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? समाधिस्थ काया तेजोमय ? श्री आशिष  बिवलकर ☆

जय जय रामकृष्ण हरी

*

फूलला मोगरा | ज्ञानियाच्या दारी |

सुगंध ईश्वरी | देऊनिया ||१||

*

मिटूनिया चक्षु | ध्यान ज्ञानेश्वर |

प्रकटे ईश्वर | ज्ञान योग ||२||

*

ब्रम्हानंदी लागे | ज्ञानियाची टाळी |

भावार्थाच्या ओळी | लिहूनिया ||३||

*

भावार्थ दीपिका | एक एक ओवी |

स्व अनुभवावी | ज्ञानेश्वरी ||४||

*

कैवल्य पुतळा | झाली ही माऊली |

ज्ञानाची सावली | उद्धारासी ||५||

*

एक एक ओवी | अमृता समान |

मराठी सन्मान | मायबोली ||६||

*

भागवत धर्म | रचुनिया पाया |

समाधीस्त काया | तेजोमय ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आसवं… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “आसवं…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 

गिळालेली आसवं कुठे जातात?

काही न राहून पापण्यावर तरंगतात.

काही दीप होऊन तेवत राहतात.

*

काही पुस्तकांची पान होतात तर

काही आपल्याकडून पुसली जातात..

*

काही नामशेष होतात,

जगणं कवटाळण्यासाठी

 *

एकाचे दुःखाश्रू

दुसऱ्याचे आनंदाश्रू होतात तेव्हा 

अश्रू ही ओक्साबोक्शी रडतात.

संपत चाललेल्या मानवतेने कोरडे होतात.

*

अश्रू खूप प्रेमळ असतात.

त्यांना किंमत दिली नाही की 

ती अस्तित्वहीन होऊन

कायमचे नाहीसे होतात.

*

मग माणसंच माणसाला 

निष्ठूर म्हणतात.

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares