मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – छकुला बालकृष्ण – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – छकुला बालकृष्ण – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

(वृत्त — पादाकुलक (८|८)) 

☆

शांत झोपला कान्हा बाई 

डोक्याखाली++ हात घेतले

गोड गोजिऱ्या वदनावरती 

मुग्ध मनोहर हास्य दाटले ||

*

काळ्या कुरळ्या कुंतलातुनी 

मोरपीस हे साजिरे दिसे 

कान्हाच्या या बालरुपाचे 

प्रत्येकाला लागते पिसे ||

*

तलम रेशमी वसने लेई 

बाजूबंद अन् करी मनगटी 

शोभिवंत ते वदन साजिरे 

ललाटावरी केशरी वटी ||

*

गोकुळ सारे बने कृष्णमय 

वेड लावितो नटखट कान्हा 

बालकृष्ण जरि डोळ्यापुढती 

वाटे माझा छकुला तान्हा ||

*

कुंजवनीची सावळबाधा

मोहविते या अवघ्या जगता 

ओवाळुनिया कुरवंडी मी 

शरण जातसे त्या भगवंता ||

☆

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मैत्रीची भूक ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मैत्रीची भूक ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

भेट ही कृष्ण सुदाम्याची

मैत्रीचे प्रतिक अजोड 

सुदाम्याचे पोहे लागे हरीला 

मिष्ठान्नाहुन अति गोड

 

बालपणीच्या नटखट लीला

दोघांना आठवती 

आलिंगन देत एकमेकांचे 

डोळे पाणावती

 

द्वारकाधीश जरी असला

कृष्ण मुरलीमनोहर

सुदाम्यासाठी त्याचा सखा

उभा दिसे समोर

 

मन हलके होई सदैव

मित्र सहवासात

चंदनाची शीतलता, सुगंध

दरवळे मनामनात

 

यशात स्तुतीसुमने सर्वच 

जयजयकार करी

वाट चुकता खरा मित्रच

कठोर कान धरी

 

सुख दुःखात जिवलग

मित्रच देई साथ

जीवाला जीव लावी

सोडे न कधी हात 

 

जिवलग मित्र असता 

सोडून लांब दूर

आठवण येता त्याची

भरून येई उर

 

कृष्ण सुदामा असो

अथवा कोणी ही आपण

मैत्रीची भूक असावी 

आपोआप जाई दडपण

©️ वास्तवरंग

☆

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ फुले बागेतली… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ फुले बागेतली… ☆ नीलांबरी शिर्के ☆

☆

फुले बागेतली

रंग गंध ल्याली

पावसात न्हाली

मनसोक्त?!

*

फुले बागेतली

परडीत आली

चरणी बैसली

देवाचिया?!

*

फुले बागेतली

उद्या सुकतील

निर्माल्य होतील

आपोआप?!

*

बागेतल्या फुला

अल्पसे जीवन

तरी दरवळून

जात असे?!

☆

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ह व्या स? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ह व्या स? ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

दृश्य विहंगम गाड्यांचे 

काल दिसले मजला 

कंटाळून खड्ड्यांना 

गाड्या गेल्या पोहायला

*

आनंदून काही गाड्यांनी 

लावले स्वतःचे हेडलाईट 

ओळीत पोहून सर्वांनी 

केल पाण्यात ऍक्रोबाईट

*

दिसेल वरचेवर माणसा 

हेच दृश्य भविष्यकाळी

फक्त गाड्यांची जागा 

शहरं घेतील त्या वेळी

*

वेळ अजुनी गेली नाही

कास धर पर्यावरणाची

नाहीतर तुझ्या ऱ्हासास

हीच डोकेदुखी कायमची 

 हीच डोकेदुखी कायमची 

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मित्रत्वाचा सल्ला ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मित्रत्वाचा सल्ला ! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

 पाऊस धो धो पडतोय 

गाठ पडली बिळात,

विसरला नाहीस नां रे

हरवले तुला खेळात ?

 शर्यतीत गाजर खाऊन

 झोपलास झाडाखाली,

 असं कसं विसरलास

 शर्यत लागल्ये आपली ?

सल्ला देतो तुला मित्रा

गर्वाच घर खाली असतं,

हवा डोक्यात गेली की

बक्षीस हमखास हुकतं !

 इसापनीतीत प्रसिद्ध 

 ससूल्या आपली जोडी,

 हट्ट करून शर्यतीसाठी

 काढू नको परत खोडी !

 काढू नको परत खोडी !

☆

आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या शुभेच्छा !

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ संस्कारांचे बीज ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? संस्कारांचे बीज ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

सुखावला आज | सखा पांडुरंग |

चिमुकल्यांसंग | पालखीत ||१||

*

निर्मळ ह्रदय | मुखावर भाव |

भक्ती गाठे ठाव | अंतरीचा ||२||

*

संस्कारांचे बीज | ओली मऊ माती |

बालकांच्या हाती | धर्मध्वज ||३||

*

सनातन धर्म | पताका भगवी |

हीच पिढी भावी | वाढवाया ||४||

*

आषाढ महिना | एकादशी दिंडी |

पिंडी ते ब्रम्हांडी | हेच सत्य ||५||

*

अवतरलीय | गावात पंढरी |

रामकृष्ण हरी | नामघोष ||६||

*

सावळा विठ्ठल | भक्तीचा भुकेला |

धावतो हाकेला | श्रद्धा मनी ||७||

©️ वास्तवरंग

☆

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आम्ही सुंदरी… ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आम्ही सुंदरी... ? शालिनी जोशी ☆

☆

नऊ पाकळ्यांचे पदर उमलले

 खरे सौंदर्य पूर्णत्वाने प्रकटले 

*

 सुगंधाची मुक्त उधळण झाली 

 फुललेली ती स्वरूपाला भाळली

*

नाजूक कोमल दोघी कलिका 

जणूं अल्लड सानुल्या बालिका

*

फुलाला पाहती स्तब्ध होऊन

भावी रूप आपले फुलात पाहून 

☆

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्वर्ग-फूल… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ स्वर्ग-फूल… ☆ नीलांबरी शिर्के ☆

☆

रात्रीच उघडते दार

गंधास येतसे बहर

किती हा बाई !!

*

ब्रम्हाच घडवी जणू

गंध अणू रेणू

तयाचा बाई !!

*

भवताल स्वर्ग होतसे

फुल हे वेगळे कसे

भासते बाई !!

*

भोवती स्वर्ग भासतो

परागी ब्रम्हा वसतो

वाटते बाई !!

*

दिसता हे स्वर्ग-फूल

पाहता पडते भूल

हात जोडले जाई !!

☆

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आनंद वारी… ☆ शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – आनंद वारी… – ? शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

☆

पाऊले चालली 

पालखी संगती

ज्ञानोबा माऊली 

मुखे नाम घेती

*

आनंदाचा कंद

हरी नाम छंद

सारे वारकरी 

नाचले ही धुंद..

*

असूनी संसारी

केले पुण्य भारी

म्हणूनी घडली

आनंदाची वारी..

☆

कवयित्री : शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड – पुणे, मो.९५९५५५७९०८

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्त्री हट्ट! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? स्त्री हट्ट! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

हट्ट कसा करायचा ते 

बायकांनाच कळतं,

पक्षी काय मानव काय

यात त्यांचंच फावतं!

*

पंख पसरला उन्हात

थंड ठेवण्या डोके प्रियेचे,

रग लागली पंखाला

सांगू कसं आता वाचे?

*

जरी धरे छत्र प्रियेवरी 

राग पहा नयनातला,

समस्त नवऱ्यांना कळावा

भाव त्याच्या मनातला!

भाव त्याच्या मनातला!

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares