मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ || मतीचे दिवाळे… || ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? || मतीचे दिवाळे… || ? श्री आशिष  बिवलकर ☆

कावीळीची बाधा | झालीय जयासी |

पिवळे तयासी | दिसे सर्व ||१||

*

दृष्टीदोष ऐसा | सारेचं पिवळे |

मतीचे दिवाळे | जगा लेखी ||२||

*

जगरहाटीचा | भुले व्यवहार |

ऐसा अहंकार | व्यर्थ सारा ||३||

*

अहंकार नासे | पूर्व पुण्यकर्म |

निंदा होई धर्म | आचरणी ||४||

*

शिव्या शाप रुपी | मुखातून वाणी |

विचारेना कोणी | स्थिती ऐसी ||५||

*

अविवेक बोल | येई ऐसे मुखी |

आप्त सखे दुःखी | तया परी ||६||

*

शहाण्यास असे | शब्दातून मार |

त्यागावा विचार | आत्मघाती ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ये फुली तू सदाफुली गं… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ये फुली तू सदाफुली गं… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

ए फुली तू सदाफुली गं 

फुलत रहा राणी

तुझ्या रुपावर भाळ-भाळले 

गाते बघ गाणी 

*

इथे तिथे तू माझ्या दारी 

आपोआप आली

नाही घेतली काळजी तरी 

बहरे तव् लाली

*

शुभ्र धवल आणि गोड गुलाबी

पाकळीत झाली 

निलवंती तू नभांगणाचे 

रंग जणू प्याली

*

सुगंध नाही तुला तरीपण 

औषध तव ठाई

तुझ्या रूपाने बहरत जावी

सारी वनराई   

*

पाच पाकळ्या तुझ्या साजऱ्या 

कधी जांभळ्या लाल

धरणी वरती जणू भासते 

फुलाफुलांची शाल 

*

कंच हिरव्या पानांमधुनी

डोकावून तू हसशी

कवितेमधली शब्द पाकळी

सदाफुली तू दिसशी 

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ निळ्या ओळी आणि क्रूस ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ निळ्या ओळी आणि क्रूस ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

काही उतरता मनातलं

सरळ निळ्या ओळींवर,  

होतो एक कोपरा रिता

ठसठसणारा कागदावर !

*

मग वाटे मम मनाला

ते झाले हलके पिसापरी,

पडता बाहेर साऱ्या वेदना 

ज्या जपल्या होत्या उरी !

*

पण येई उगाच मनात 

विचार निळ्या ओळींचा,

होत असेल का त्रास

त्यांना माझ्याच वेदनांचा ?

*

पण विचार करता पटले 

जो तो भोग घेऊन जन्मतो,

वाटले जरी मजला वाईट 

जो तो आपला “क्रूस” वाहतो !

जो तो आपला “क्रूस” वाहतो !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ || डू नॉट डिस्टर्ब… || ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? || डू नॉट डिस्टर्ब… || ? श्री आशिष  बिवलकर ☆

चालून चालून | वाघोबा दमला |

झोपेत रमला | शांत आज ||१||

*
डू नॉट डिस्टर्ब | दिली आहे तंबी |

एक किमी लंबी | केली चाल ||२||

*

लबाड लांडगे | सगे सोबतीला |

कुटुंब कबीला | बछड्यांचा ||३||

*
वृद्ध हत्ती आला | डोलत डोलत |

अस्पष्ट बोलत | ‘फ’ची भाषा ||४||

*
वाघासंगे होते | कोल्हे कुत्रे ससे |

भोंगा नाही दिसे | नेहमीचा ||५||

*
बासनात गेला | भोंग्याचा गोंगाट |

नका लावू वाट | सर्कशीची ||६||

*
सुखी शांत निद्रा | वाघोबाचा थाट |

पहा आता वाट | उठायाची ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ एकच प्रार्थना… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? एकच प्रार्थना… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

शेंगेतले दोन दाणे जणू जुळे भाऊ

पांघरूण काढलं तरी म्हणतात

जरा झोपून घेऊ – – 

 

झोप झाल्यावर न कळे..  भविष्य असेल काय !

कुणी कढईत कोणी खलबत्यात

कुटलं जाय !! – – 

 

शेंगदाणा जाणतो .. नंतर होतं काय

एकच प्रार्थना मनोमनी की

एक तरी मातीत पेरलं जाय !! – – 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ || जाब विचाराया नाही आलो… || ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? || जाब विचाराया नाही आलो… || ? श्री आशिष  बिवलकर ☆

काय विठ्ठला,

पंढरी तुझी भक्तांनी सजली!

ओल्या डोळ्यांनी आलो,

पावसाने भाकरी माझी भिजली!

*

शेतात कष्ट करून,

जगाला म्हणे आम्ही पोसतो!

नुकसान झालया,

नशिबाचा फेरा नेहमीच सोसतो!

*

आषाढीला आलो होतो,

मागितलं चांगल पीक पाणी!

आभाळच कोसळलं,

आम्हा उरला ना वाली कोणी!

*

कसली दिवाळी- दसरा,

चिंधी नाही घेतली लेकराबाळा!

फाटकंच लुगडं नेसलं तिनं

कारभारीण हात लावी कपाळा!

*

गोडधोड केल नाही लेकराना,

दोन वेळ अन्नाची उरली भ्रांत!

देवा रडगाणंच म्हण माझे,

कसा राहू मी आता तरी शांत!

*

जाब विचाराया नाही आलो,

पंढरीनाथा तुझ्या दारात!

माऊलीच तू माझी,

घे दुःख लेकराच पदरात!

*

बळ दे झुंजायला,

साकडं घालतो आता!

परीक्षा नको घेऊ,

चरणी टेकतो माथा!

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हात धरू शकताय तोवर… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? हात धरू शकताय तोवर… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

अजुन किती खोल बुडणार

या आभासी भुलभुलय्यात!

हात धरू शकताय तोवर

धरा हात अन या वास्तवात

*

भासच सारे आहेत तिथ

हाती काही लागणार नाही

भविष्य साकारायच्या वयात

आभासात गुंतण इष्ट नाही!

*

नुसत बघत बसू नका पोरांनो

वेळ आहे तोवर सावध व्हा!

एकमकांचा हात गुंफून सारे

हात धरा माझा बाहेर या!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वैशाखात अग्निपुष्प ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? वैशाखात अग्निपुष्प ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भावगीत – वर्ण संख्या 16 यती 8 व्या अक्षरावर) 

केशरांगी बहरल्या तेजोमय पलाशाला 

वैशाखात अग्निपुष्प भासतात जणू ज्वाला ||ध्रु||

*
किती शिकावे शिकावे पळसाचे गुण घ्यावे 

ब्रह्मा विष्णू महेशाने येथे निवासाला यावे 

भेगाळल्या मातीवर बहर फुलांचा आला

वैशाखात अग्निपुष्प भासतात जणू ज्वाला ||1||

*
कधी भासतो तो मला ध्यानस्थ बसला योगी

रणरणतो भास्कर चटके पळस भोगी

वसंतवैभवातला किरिट पलाश झाला

वैशाखात अग्नीपुष्प भासतात जणू ज्वाला ||2||

*

कालीमाता सरस्वती यांच्या पूजेसाठी फुले

विदर्भात वापरती सान थोर आणि मुले

ढाक, टेसू, ब्रह्मपुष्प किती नावे पहा याला

वैशाखात अग्निपुष्प भासतात जणू ज्वाला ||3||

*
ऋतुसंहार हे नाव कालिदासांनी दिलेले

अर्धचंद्रकृती चोच पाकळ्यात वसलेले 

पुष्पे पाहूनच येती पक्षी क्रीडा करण्याला

वैशाखत अग्निपुष्प भासतात जणू झाला ||4||

*
बहुगुणी वैद्यराज शेतकऱ्याचा हा मित्र

सर्वमान्य भोजनास होते मान्य याचे पात्र

चोची पक्षाच्या भासती रंग कुसुंबी फुलाला 

वैशाखात अग्निपुष्प भासतात जणू ज्वाला ||5||

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नावातच सगळं आहे☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ नावातच सगळं आहे ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

टेंभा मिरवायला मराठीचा 

आहे कार्यक्रमांचा सुकाळ,

पण समारंभाला नांव देतांना 

पडे मराठी शब्दांचा दुष्काळ!

*

आंग्ल भाषेचा आधार घेतला

तरच म्हणे हल्ली मराठी कळतं,

मग अशा समारंभाना उगाच 

मिरवणाऱ्यांच पाऊल वळतं!

*
जुने जाणते खरे अभ्यासक 

वंचित राहतात अशावेळी,

प्रयोजकांपुढे आयोजकांची 

बसते चांगलीच दातखिळी!

*
LIT FESTला मराठी प्रतिशब्द

शोधायला घ्या एखादी कॉन्टेस्ट,

जर नाहीच मिळाला कुठे तो 

करा साजरी “अभिजात LIT FEST”

करा साजरी “अभिजात LIT FEST”

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ || भुरळ… || ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? || भुरळ… || ? श्री आशिष  बिवलकर ☆

शोधक या नजरेला,

तुझीच रे आस आहे |

क्षणोक्षणी आहे संगे,

त्याचा मज भास आहे |

*

मागे वळून पाहतांना,

स्वप्नांनी भरलेली वाट |

संपता संपत नाही रे,

आठवणींचा थयथयाट |

*

वावरले होती तुज संगे,

सोडून जगाची रे लाज |

रंगीत स्वप्नांची झालीत,

आसवे कशी रे आज |

*

काय सांगावे कोणास,

जडली होते रे वेडी प्रीत |

हरवलास सोडून वाटेवर,

विखुरले रे प्रणयाचे गीत |

*

काही केल्या उमजेना,

कशाची घातलीस रे भुरळ |

तू जरी नाही सोबतीला,

हृदयात तुझेच स्थान रे अढळ |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares