मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “ स्थितप्रज्ञ“ ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी 

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – वेड्या सावल्या – ? ☆ श्री सुहास सोहोनी

या कृष्ण सावल्या, लांब पसरल्या

दाविति भय वाकुल्या

तिन्हिसांजेच्या फुटक्या वेळी

नाच नाच नाचल्या

 

वक्रांगाच्या विक्षेपाने किती

घालिती भिती

हडळ म्हसोबा दिसती  त्यातुन

आणिक भानामती

 

अन् जरब घालती मुक्या मनाला

दैत्य राक्षसांची

यमधर्माची, मृत्यूची, अन्

नरक रौरवाची

 

आणि उमटती डोळ्यांपुढती

विचित्रशा आकृती

गमते त्याही रागिट डोळे

वटारुनी पाहती

 

पण .. .. .. 

या खुळ्या सावल्या उगाच करती

थिल्लर पोकळ बात

त्यास न ठावे अम्हा जवळिचे

अमुचे एक गुपीत

 

या गुपिताने आम्हास दिधले

ऐसे एक घबाड

आम्ही आता गेलो आहो

भीतीच्या पल्याड

उधळुन जाळून टाकिल सारे

चिल्लर थिल्लर बंध

मानगुटीवर बसला ऐसा

आमुच्या ब्रह्मसमंध

कितीक संत महंत जनांना

अपुल्या नादाने

पार टाकले झपाटुनीया

ब्रह्मसंमंधाने

महिमा ब्रह्मसमंधाचा ऐसा

कसलि न उरली भिती

कृष्णसावल्या उजळुन गेल्या

ना त्यांची गणती

लाखो वारकरीही , 

भुलले याच समंधाला

शुभ्र धवल सावलीत त्याच्या, 

येती आश्रयाला

©  श्री सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तुझी साथ… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – तुझी साथ ?  सुश्री संगीता कुलकर्णी ☆

पौर्णिमेच्या रात्री

चंद्र होता साक्षीला

भेट अशी नशीली

चिंब भिजल्या आठवणी

*
काळजाच्या गाभारी

स्पंदने मुग्ध झाली

बोलावया आतुरती

शब्द विरून जाती

*
लाजेत माझ्या न्हाऊन निघती 

तुझा जीव माझ्याच अंतरी 

गंध प्रेमाचा फुलवायला

तुझीच साथ हवी

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कटू वास्तव… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कटू वास्तव…  ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

एक दिवस योग करूनी

योगाला सन्मानित करतो

तनमनाला तरतरी येते

याचा नीत उच्चारही करतो

*

परकीयांनी योग घेतला

आपल्या देशी विकसीत केला

अभिमानाने बोलत बसतो

कृतीत आणाया नाही जमला

*

परकीयांचा पिझ्झा बर्गर

आम्हास जीवासम प्यारा

योग करण्याच्या सवयीला

आमच्या दिनक्रमी नाही थारा

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – मुक्ता… – ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – मुक्ता… – ☆ सौ राधिका भांडारकर ☆

बंधनमुक्ता आनंदमयी

बेभान किती स्वानंदसुखी 

धारा धारा घे अंगावरी 

तल्लीन होय ती चंद्रमुखी.. १

*

 एक नाद तो घुमघुम वाजे

 गडगड मेघा ताल देतसे 

त्या तालावर बेभान तिचे

 नाचणे कसे हे रंगतसे.. २

*

 नाते जुळता त्या धारांशी 

 मिठीत जाता मग वरुणाच्या

आनंद खरा तो जाणवतो

चिंता सरती आयुष्याच्या.. ३

*

नाच नाच गे घुमा म्हणवितो

 विसर विसर गे पदात बेड्या 

धुंद हो स्वैर पावसात तू 

भय कशास हे मनात वेड्या.. ४

*

देहावरच्या स्पर्शात ओल्या 

नाहतेस तू चिन्मय कळी

थेंब थेंब हे वरदानाचे 

घे साठवून तुझ्या ओंजळी.. ५

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ तुमने बुलाया और हम चले आये… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “तुमने बुलाया और हम चले आये…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“अरे मला वर तर आधी घ्याल की नाही! … असा किती वेळ दोन्ही हातांनी या दाराच्या चौकटीवर लोंबकळत राहू म्हणता? … अवघडून अवघडून हाताला रग लागून दुखायला लागलेत! … आणि तुम्हांला सोडून खाली उडी मारून दुसरी कडे जाण्याची दारं सुद्धा बंद झाली आहेत… काय म्हणता मला तुमच्यात पुन्हा सामावून घ्यायला जागाच शिल्लक उरली नाही! … अरे असं कसं बोलता तुम्ही? .. मी तर पहिल्या पासुन तुमच्याच गटाचा ओरीजनल सक्रीय कार्यकर्ता आहे! .. ते मधेच आपल्या गटनेत्या बरोबर तात्विक मतभेदांमुळे आणि माझ्या एकनिष्ठेवर त्यांनी अविश्वास दाखवल्या मुळे मी नाराज होऊन आपला गट सोडून गेलो होतो… आपण गटात नसताना आपली खरी किंमत काय आहे ती गटनेत्याला लवकरच कळून यावी म्हणून तो मी एक डाव खेळलो होतो… पण माझ्या लक्षात आलयं, मी नसल्याने गटाची ध्येय धोरणांची दिशाच भरकटून गेली आहे.. काही आपमतलबी कार्यकर्ते च्या गराड्यात गटनेते अडकले गेले असल्याने त्यांची विवेकबुध्दी चालेनाशी झालेली दिसतेय. गटात अनागोंदी आणि अराजकता माजलीयं… स्वार्थाच्या बजबजपूरीने गट खिळखिळा झालाय त्यामुळे आपल्या संघात आपल्याच गटाचा प्रभाव संपत चाललाय… तुम्ही तर माझ्या मागाहून गटात आलेली कालची मंडळी आहात तुम्हाला कदाचित मी काय बोलतोय हे नीट कळणार नाही… आपले ते जेष्ठ गट प्रतोदांना जरा  विचारून पहा म्हणजे कळेल तुम्हाला… इतकंच कशाला मागच्या सहा महिन्यापासून माझं त्यांचं अनौपचारिक बोलणी होत होती त्यांनीच मला तुमच्या सारख्या जुन्या जाणत्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांची गटाला गरज आहे तेव्हा स्वगृही परत या म्हणून… कोणत्या वेळी यायचं आहे हे नक्की झालं कि तुम्हाला संकेत करतो तेव्हा असेल तसे आणि जिथे असाल तिथून सगळे पाश तोडून तात्काळ आपल्या गटाकडे या… गट तुमच्या स्वागताला सदैव तयार आहे… सगळी आपलीच घरची मंडळी आहेत.. तेव्हा कुठल्याही मानपानाचा किंतू मनात न आणता आपल्या गटात पुर्नमिलन करून गटाची ताकद वाढवूया… तसा संकेत मला  आजच मिळाला म्हणून तर मी स्वगृही परत आलोय.. इतकं तुम्हाला जीव तोडून सांगतोय तरी मला तुम्ही आत घेण्याच्या ऐवजी दारावरच लोंबकळत ठेवलात.! .. अरे हे काय मी कुणाशी बोलतोय? माझं तुमच्यापैकी कोणी ऐकतयं काय?  आणि तुम्ही सगळे मी इथं दारावर लोंबकळत तुमच्याशी बोलतोय तर तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करून त्या तिकडे नजर लावून काय बघताय.? .. अहो तो त्यांच्या गटात फार मोठा राडा माजलाय.. मी तिकडूनच बाहेर पडून पुन्हा आपल्या गटाकडे आलोय की… काही नाही हो त्यांच्या गटात फारच सुंदोपसुंदी आहे.. जो तो स्वताला मीच गट नेता म्हणवून घेत बसलाय.. आपापल्या संख्या पाठबळाची ताकद दाखवणं सुरू आहे… सगळा तिथे मनी मसल नि पाॅवरचा गेम चाललाय… गटाची तत्वं, धोरणं, ध्येय वगैरै त्यांनी चुलीत घातलयं… राखरांगोळी करायला निघालेत ते… गटशुध्दीसुचेताच्या नावाखाली जे आंगातूक होते त्यांच्यावरच आगपाखड करून त्यांना गटाच्या बाहेरचा रस्ता दाखवला हो त्यांनी… मलाही… त्यांनाच जर आपली कदर करायची नाही अश्या ठिकाणी न राहिलेलं बरं… शेवटी स्वाभिमान नावाची काही चीज असते की नाही खऱ्या कार्यकर्त्या च्या अंगी… मग मी ठरवलो गड्या आपला पूर्वीचा गट बरा… पक्षप्रतदोंशी सोसायटी चेअरमन च्या मुलीच्या लग्नाच्या वेळी भेट घेतली आणि  एकूणच आढावा दिला.. त्यावेळी त्यांनी मला शब्द दिला होता तुम्हाला आमचे दरवाजे सदैव उघडे आहेत… या घरं आपलचं आहे… त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून तर इथं आलो आणि पाहतो तर दारातच तुम्ही मंडळी माझी वाट अडवून बसतात… हे काही नैतिकतेला धरून बरोबर नाही.. असा अवमान करायला तुमचं धारिष्ट्य होतचं कसं.? . तुम्ही आधी त्या गट प्रतोदांना आधी इथं बोलवा नाही तर मला त्यांच्या कडे घेऊन चला मग काय ते होईल दूध का दूध नि पानी का पानी! … समजलं! … “

” अवं अन्ना का उगा आपलं रगात आटवून घ्यायला लागलासा! … आता इथं जागाच शिल्लाक नाही आणि तुमास्नी कुठं उरावरं घेऊन बसायचं हो… त्याचं कायं अन्ना मी काय सांगतू त्याचा जरा गांभिर्यानं इचार करा तुमच्या फायद्याचचं असणार आहे.. अवो तुमचा तो आमचं प्रेरणास्थान, शक्तीस्थान, स्फुर्ती स्थान, आशास्थान, देवस्थान…. आणि आणि हि सगळी तुमच्या वेळीची स्थानं आताच्या जमान्यात भंगारात निघाली, मातीत गाडली गेलीत बघा… आता तुम्हाला आम्ही फोटूच्या चौकटीत बसवून तुमचा पोवडा गाऊन आमचं राज्य करनार.. आणि ते बघा नव्या पिढीचे नवे शिलेदार म्हंजी, आमचे दादा, आप्पा, भाऊसाहेब, भैय्यासाहेब, तात्यासाहेब, काका, मामासाहेब, युवानेते,… हि मंडळीची फौजच तयार झाली बघा… ते साम दाम दंड नि भेद हि जुनी चौकडी संस्कृती कंडम ठरली इथं आता एके, रिवव्हावलर, कट्टा, खोका या भाषेतच सगळं चालतया… तुमच्या विवेकाची पुंगळीने आता साधा फटाका बी इथं उडत नाही तर धमाकेदार धमाका करायला बाॅम्बच बाळगतात… आणि अन्नसाहेब तुम्ही इथलच ओरीजनल सोताला म्हणवून घेता मगं का हो तुम्ही मधीच बंडखोरी करून ऐनवेळी बाहीर पडलात… अन तिथं बी हाताला काय गावंना, त्यांनी तुम्हालाच लाथा घातल्यावर तवा तुम्हासनी जुनं ते सोनं आठवलं होय… गटप्रतोदाचे पाय धरून (धुवून) पुन्हा गटात यायचा घाट घातलाय काय? .. पण तुम्हासनी सांगतो शेवटी तुम्ही पण गद्दारच निघाला हायसा… आणि इथं गद्दारांना गटात घेतलं जात नाही… त्या गटात राहून तुम्ही काय दिवे लावलेत हे आम्हांला दिसतचं आहे… तवा तुम्ही माझं ऐका आता गप गुमान सोताच्या घरला जावा नि बायका मुलात हरि हरि करत बसा… आता कुठं गटाची सेवा करण्यासाठी जीवाला उगी तोसीश लावून घेताय… इथं तुम्हाला कोणं काळं कुत्रं देखील विचारणार नाही… तुमची धमक संपली आहे आणि जो कमजोर तोच कामचोर या न्यायाने तो पुन्हा शिरजोर होण्यापूर्वीच त्याची अशी उचलबांगडी करायची हिच नवी खेळी गट प्रतोदांनी खेळली आहे…

आणि तसंही म्हणाल तर त्या दुसऱ्या गटाला खिंडार पाडून किती कार्यकर्ते तुमच्या बरोबर आपल्या गटाकडे घेऊन आलात ते तरी सांगा… मगतरी तुम्हाला सन्मानानं गटात सामील करून घेऊ… नाही ना जमलं एव्हढीही तुम्हाला तिथं राहून… मग आमच्या बरोबर गद्दारी करून तुम्हाला नेमकं काय मिळालं ते तरी सांगा.. दिलं का त्यांनी अध्यक्षाचं पद निदान गटप्रतोद पद, गेलाबाजार गटाधिकारी तरी… नाही ना… अहो उपऱ्यांना काही मिळत नसतं फक्त आधार दिला जातो हेच उपकार केले जातात.. ना त्याचं कोणी ऐकत ना त्यांना चारचौघात बोलायला दिलं जातं… आधी गट समजून घ्या समजून घ्या या नावाखाली बरीच वर्षे हिणवत राबवून मात्र घेतलं जातं… होय कि नाही… तुमचा काही याहून वेगळा अनुभव आहे काय… मगं घुसमटलेला जीव बाहेर पडणारच की जुन्या गटाकडे यायला मागणारचं कि… पण मला एक सांगा तुमच्या बरोबर इथं असणारी जी तुम्ही बंडखोरी करून निघून जाऊन परत तुम्ही इथं आल्यावर ती मंडळी तशीच राहतील… का नाही त्यांनी त्याची प्रगती करून घ्यावी.. त्या़ची विचारसरणी का नाही अमंलात आणावी.. त्यांना कधी एक्सपोजर मिळावं… तुमच्या सारखे गुळाला मुंगळे कायमच चिकटून बसलेले असताना त्यांना संधीची वाट मिळताच का नाही त्यांनी आपलं सोनं करून घेऊ नये… अवो अन्ना हि एक झलक तुम्हाला दाखवली आहे.. अजुन हिमनग पाण्यात खोलवर रुतून बसलाय… तुम्हारे बस की बात अब नही रही… तेव्हा तुम्ही आता इथून बऱ्या बोलानं जायचं बघा… नाहीतर कायमचे घालावयचे मार्ग आम्हाला मोकळे आहेत… तो तुम्ही आम्हाला धरायला लावू नका… आणि उद्या तुम्हीच मिडियाला सांगाल गटप्रतोद परदेश दौऱ्यावर गेल्याने अन्नाचां स्व गृह प्रवेश लांबला… आणि हे जर तुम्हाला जमणार नसेल तर तर तुम्हाला उभ्याचे आडवे करण्याशिवाय पर्याय उरणार नाही… कसं? …

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ताम्हण रे ताम्हण… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ताम्हण रे ताम्हण… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

ताम्हण रे ताम्हण 

जांभुळले हे मन 

लाघवी दिसे असा 

वैशाख तापे जसा

*

चुणीदार झालरं

पाकळीत सादरं

चैतन्य देतो कसा 

वैशाख तापे जसा 

*

बनात तू रानात 

डोंगराच्या वनात

पानात खुले कसा 

वैशाख तापे जसा

*

जारूळ म्हणती रे 

बोंडारा गणती रे 

निलम रत्न असा 

वैशाख तापे जसा

*

राज्यपुष्प देखणे

उन्हातले चांदणे

शांतीचा देतो वसा 

वैशाख तापे जसा

*

बहरून आला हा 

लावण्य झाला हा 

मोहवी वेडापिसा

वैशाख तापे जसा

*

सूर्याची पखरण 

तरारे तुझे मन

मनात माझ्या ठसा

वैशाख तापे जसा

*

गुलाबी नि पांढऱ्या 

क्वचित रे पिवळ्या

अंगांगी बहरे तसा

वैशाख तापे जसा

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्वप्न येईल सत्यात… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? स्वप्न येईल सत्यात... ? सौ शालिनी जोशी 

 सकाळच्या या वेळी

 तिरीप दारी किरणांची

 उंबऱ्याशी बसून आजी

 दिसे वाट पाहे कोणाची – – 

*

 वेळ ही गडबडीची

 परी आजी दिसे निवांत

 चिंतेची रेषा उमटली

 चेहऱ्यावरच्या सुरकुत्यात – – 

*

 घरात सारा शुकशुकाट

 सारी मुलेबाळे पांगली

 पोटासाठी दूर देशी

 जाऊन असावी स्थिरावली – – 

*

 चौकट वाड्याची रंगीबेरंगी

 साक्ष गत वैभवाची 

 गजबज होती मुलामाणसांची

 आणि हालचाल पाहुण्यांची – – 

*

 वेळ पुरत नव्हता आजीला

 शेती घर सांभाळताना 

 आता राहिली एकटी

 घर तिला सोडवेना – – 

*

 भाकरीची चवड थापून

 खरखरीत आजीचे हात

 आता कोणासाठी रांधावे

 प्रश्नाला उत्तर नव्हते सापडत – – 

*

 सर्वच खेड्यांची ही व्यथा

 करू आशा होईल दूर

 येतील नवीन लघुउद्योग

 खेड्यात शेतीबरोबर – – 

*

 खेडीच होतील नंदनवन 

 नव वैभव होईल प्राप्त

 आजीचे स्वप्न येईल सत्यात

 जय किसान जय नवभारत – –

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ क्षणार्धात संपला, सुंदर स्वप्नांचा डाव ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? क्षणार्धात संपला, सुंदर स्वप्नांचा डाव ? श्री आशिष  बिवलकर ☆

निष्पाप निरागस,

जीव तीन कोवळे |

झडप काळाची,

पाणावलेत डोळे |

*

सुंदर फुलण्याआधीच,

काळाने कळ्या तोडल्या |

क्रूर निष्ठुर नियतीने,

अग्नीकुंडात जाळल्या |

*

निरागस नजर,

निरागस त्यातले भाव |

क्षणार्धात संपला,

सुंदर स्वप्नांचा डाव |

*

मृत्यू म्हणजे काय,

समजण्यापलीकडचे वय |

गाठले मृत्यूने त्यांना,

कशाचीही नाही केली गय |

*

हसतं खेळतं कुटुंब,

क्षणात झालं उध्वस्त |

अग्नीच्या ज्वाळांनी,

क्षणात केलं फस्त |

*

सांग ना गं नियती,

इतकी निष्ठुर का वागली |

गोऱ्या गोबऱ्या गालांवरची,

लाली कशी ना तुज उमगली |

*

वज्राहून कठोर हृदये,

ती देखील पिळवटलीत |

पाहून मृत्यूचे थैमान,

करोडो मनं हळहळलीत |

*

शेवटचा गोड हा सेल्फी,

लावून गेला जीवाला खंत |

वैरी जरी असला कोणी,

नसावा त्याचा असा अंत |

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

दि. 14 जून 2025

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दिसतं तसं नसतं हो… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? दिसतं तसं नसतं हो…  ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

असणं आणि दिसणं यात

खूप काही फरक असतो

फोटोमधे बघत असता

 प्रामुख्याने तो जाणवतो

*

नरम मुलायम रेशीम रेती

त्यावर हटयोग करे युवती

निरखुनी पहाता सारे कळते

समजुन येते आपली फजिती

*

दृष्टीभ्रम हा असेल अथवा

युक्ति फोटो काढायाची 

म्हणून मत देण्याआधीच

सवय करावी निरखायाची

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – पाऊस आला रे SSSSS…! – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे + संपादकीय निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

💐 अ भि नं द न 💐

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ.ज्योत्स्ना तानवडे  यांना मनस्पर्शी साहित्य प्रतिष्ठान ने सन्मानित केले आहे. प्रतिष्ठानच्या लेखन उपक्रमात साप्ताहिक कविता आणि मासिक लेख वर्षभर लिहिल्याबद्दल सातत्यपूर्ण उत्तम लेखनाचा विशेष  पुरस्कार  त्यांना प्राप्त झाला आहे.

ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे सौ.तानवडे यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐

आजच्या अंकात वाचूया सुश्री ज्योत्स्ना तानवडे चा चित्रकाव्य – पाऊस आला रे SSSSS…! 

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – पाऊस आला रे SSSSS…! – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

आला पाऊस झिम्माड 

मैदानात पाणी पाणी 

पाण्यामध्ये नाचताना 

मुले गाती गोड गाणी ||

*

गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्यात 

येरे येरे तू पावसा 

छत्री उंच उडवूनी 

मुक्त भेटती पावसा ||

*

पावसात भिजण्याची 

मजा वाटे किती न्यारी 

भिजवती एकमेका 

थयथय नाच भारी ||

*

मुले आणि पावसाची 

घट्ट मैत्री आनंदाची 

धुंदी झिरपे मनात 

आठवण आयुष्याची ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares