श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ पाऊस माझा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
समजून घे पाऊस माझा,
आता कधी म्हणणार नाही
स्वच्छ आहे आभाळ आता
मेघ भरुन येणार नाही.
वृक्ष सुजाण झालेत आता
वात त्यातून फिरणार नाही.
पाखरे गेली कधीची, कुठे ती,
गीत आता गाणार नाही.
तृप्त झाले लुप्त चातक,
थेंब चोचींत घेणार नाही.
शांत झाली वीज आता
जी कधी चमकणार नाही.
झाले मयूर परदेसी कधीचे
नृत्य ते करणार नाही.
नाहीस तू आता म्हणूनी
ऋतू पावसाचा येणार नाही.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




