सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ काळ– – – ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

 काळ कुणाला समजत नाही

काळ कोणाचे ऐकत नाही

जरी मिरवले द्रष्टा म्हणुनी

तरी दैवापुढे काही चालत नाही ||

*

कोण चूकीचे कोण बरोबर

कोण चांगले कोण आहे वाईट

येता वेळ निघून जायची

कोणतेच नियम त्याला नाहीत||

*

कोण लहान वा असो कोण मोठा

ज्याचा जेवढा आहे येथे साठा

अंतीम क्षण तो समीप येता

काळा पुढे न चाले हो ताठा||

*

आताचा क्षणच आपला आहे

पुढच्या क्षणाचा नाही भरवसा

जगू हा क्षणच प्रेमाने आनंदाने

आयुष्यावर पाडू स्नेहल कवडसा||

*

म्हणूनच असे जगू या जीवनामध्ये

आहे आपले जीवन जोवर

असुया वाटेल काळाला ही

म्हणेल कदाचित येईन नंतर||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments