श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३२४
☆ काठी सावर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
कसरत करते तारेवरची
खाण्यासाठी भाकर मिरची
*
बाप वाजवी ढोल चामडी
पोरे जमली पारावरची
*
सावकारही आला होता
डोक्यावरती टोपी फरची
*
कुणी न आले वाचवायला
फुले वाळली वेलीवरची
*
मनात आहे काय चालले
रेघ सांगते भाळावरची
*
या कष्टाची भीक तोकडी
कळी खुलेना गालावरची
*
तोल म्हणाला नको घाबरू
काठी सावर हातावरची
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




