कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # ३११ – विजय साहित्य
☆ संवादी चाफा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(दशाक्षरी)
☆
आयुष्य झाले, कट्टर वैरी
दुःख शिदोरी, उरली मागे
आठवणींचा, संवादी चाफा
सांधत गेला, काळीज धागे..!
*
विचित्र आहे, माणूस प्राणी
श्रेय सुखाचे, स्वयें लाटतो
दुःख नशीबी, असते तेव्हा
शिव्यालाखोली, फुका वाटतो.
*
जखमा देते, दुःख डागण्या
त्याच व्यक्तीचे, गाई गोडवे
भरले नाही, घाव तरीही
मुळी न त्याची, साथ सोडवे
*
काळीज धागे, विरून गेले
तरी मनी का, कशिदा कारी
मनातल्या त्या, मनात तेव्हा
दुःख मांडते, पंगत भारी..!
☆
© कविराज शब्दसम्राट विजय
(विजय यशवंत सातपुते)
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





