श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
आयुष्याच्या संध्याकाळी...
श्री आशिष बिवलकर ☆
☆
आयुष्याच्या संध्याकाळी,
ही भिंत फक्त आड आहे |
सरले कित्येक ऊन पावसाळे,
तुझी माझी मैत्री जीवापाड आहे |
*
दोन घरात, दोन अंगणात,
या भिंतीची आडवी रेष आहे |
गात्र जरी थकलीत आपली,
एकमेकांच्या ओढीचा आवेश आहे |
*
उभ्या असलेल्या भिंती पलीकडे,
तुझ्या मैत्रीचा तो विरंगुळा आहे |
हितगुज करतानाचा तुझा माझा,
आठवणींत रमण्याचा नाद खुळा आहे |
*
अवघाची संसार हा केला,
सुखी समाधानी परिवार आहे |
भरल्या ताटावर जरी बसलोत,
खेळीमेळीचे उरले दिवस चार आहे |
*
डोळे जरी पैलतिरी लागलेत,
समवयस्क म्हणून आधार आहे |
पिकलं पान कधी पण गळेल,
हा समज तुझ्यामुळे निराधार आहे |
©️ वास्तवरंग
☆
(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर)
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





