सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 275
☆ भिडस्त… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
“भीड भिकेची बहीण”
ही म्हण लहानपणापासून ऐकलेली !
पण काही वेळेस,
“कळतं पण वळत नाही”
असं होऊन बसतं !
पण आपण असावंच तसं,
रोखठोक,
निदान कवितेची निवड करताना,
बाळगावाच धीटपणा,
सारी भीड बाजूला सारून !
सुमार कलाकृतीला,
का द्यायची खोटी – खोटी दाद ?
असे करून खरोखर,
खालावतो दर्जा,
आपल्या अभिरूचीचा !
म्हणूनच,
द्यायची दाद नेहमीच,
सरस आणि सकस साहित्यकृतीला !
सारी भीडभाड बाजूला सारून,
ठामपणे!
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



