सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 275 ?

☆ भिडस्त… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

“भीड भिकेची बहीण”

ही म्हण लहानपणापासून ऐकलेली !

पण काही वेळेस,

“कळतं पण वळत नाही”

असं होऊन बसतं !

पण आपण असावंच तसं,

रोखठोक,

निदान कवितेची निवड करताना,

बाळगावाच धीटपणा,

सारी भीड बाजूला सारून !

 

सुमार कलाकृतीला,

का द्यायची खोटी – खोटी दाद  ?

असे करून खरोखर,

खालावतो दर्जा,

आपल्या अभिरूचीचा !

म्हणूनच,

द्यायची दाद नेहमीच,

सरस आणि सकस साहित्यकृतीला !

सारी भीडभाड बाजूला सारून,

ठामपणे!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments