सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३०३ ?

☆ रंग… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आजकाल माझ्याशी बोलतात रंग

आपल्याच मार्गाने चालतात रंग

केशरी फुलासाठी शोधते गुलाब

त्याच त्या कहाण्या मग सांगतात रंग

 *

मोग-यास  माळूनी होता गंधधुंद

एक गोष्ट  बेरंगी  मांडतात रंग

 *

सप्तरंग सृष्टीचे वेढती मलाच

चार बोल बोलूनी रंगतात रंग

 *

झाड झाड प्रेमाने  साद घालतेच

सावलीत  हिर्वाई दावतात रंग

 *

भांडतात आकाशी नील शाम श्वेत

 वेगळेच आताशा वागतात रंग

 *

 रंगताच रंगाचा सोहळा नभात

सागरात जोशाने सांडतात रंग

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments