सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचताना वेचलेले ?

☆ पावसा पावसा… कवयित्री : सुश्री सुचेता गोखले ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

पावसा पावसा कुठे आहे तुझे गाव

जाण्याचे म्हणून तू घेतच नाहीस नाव .. 

*

ग्रीष्मात तुझे आम्ही केले स्वागत

चिकटूपणा भारी तुला आहे अवगत .. 

*

अवनी तहानेने झाली होती व्याकुळ

साद तिची ऐकून, घातलास तू धुमाकुळ .. 

*

चिंब ओली धरणी मग कित्ती सुखावली 

निसर्गात मग कुंद धुंद हिरवाई पसरली .. 

*

बाळराजे अंगणात नाचू लागले थय थय 

बळी राजा झाला प्रसन्न,बघून ओले वलय .. 

*

हिरवी शाल लेवून, ही अवनी नटली

नव चैतन्याने सृष्टी जणू  मोहरली .. 

*

विठ्ठलाच्या वारीमध्येसुद्धा तू भेटलास

रेनकोट घालून तू सुद्धा लेझीम खेळलास .. 

*

बाप्पा आले घराघरात ,घडला सत्संग

पाऊस गाणी गात भक्तगण झाले  दंग .. 

*

तुझ्या साक्षीने पार पडले नवदुर्गा पूजन

नवरंगी छत्र्या घेऊन आले रसिक जन .. 

*

आली दिवाळी, मनी आले, गेली तुझी स्वारी !

.. .. फराळ,फटाके,अभ्यंग आणि रांगोळ्या,

    बासुंदी,करंजी आणि श्रीखंडात चारोळ्या.

      सरली की दिवाळी .. . आणि अरेच्चा .. 

      आला का तू पुन्हा !!! 

आता काय ??? 

.. .. आता पतंग उडवतच जाणार का रे राजसा ….

*

कवयित्री : सुचेता गोखले

संग्रहिका : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments