डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘शेवटचा दुर्दैवी अध्याय …’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

सुवर्णमहोत्सवी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या प्रभात कंपनीच्या संत तुकारामया चित्रपटाच्या गाथेचा शेवटचा अध्याय दुर्दैवीच म्हणायचा.

ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू आणि वास्तू जपण्यात आपण भारतीय किती संवेदनशील (! ) आहोत याच्या खुणा देशातील कानाकोपऱ्यात आढळून येतात.

– – व्हेनिस चित्रपट महोत्सवात ‘सर्वोत्तम चित्रपट’ हे ‘संत तुकाराम’ चे मूळ प्रमाणपत्र बरीच वर्षे हरवलेले होते. कोणाकडून, कां, कसे, कधी, हे प्रश्न इथे असंबद्ध आणि अप्रासंगिकच समजा. आपल्याला वाटत असेल, होता तो केव्हाचा तरी जुन्या जमान्यातील एक सिनेमा! एवढे काय मनाला लावून घ्यायचे! मुळात ते हरवलेले अमूल्य कागद गवसले नसते तरी ‘अळी मिळी गुप चिळी’ म्हणत आम्ही स्वस्थ बसलो असतो.

पण तुकारामांची फरफट आजच्या जमान्यात देखील सुरु ठेवण्यात अग्रेसर असलेले आपण कर्मदरिद्री आहोत हे एका प्रसंगाने दाखवून दिले – – 

– – – १९३६ सालचे ते हरवलेले मूळ प्रमाणपत्र १९७४ साली तिरुवनंतपुरमच्या सनी जोसेफ नामक सिनेमॅटोग्राफरला पुण्यातील लॉ कॉलेजच्या कचराकुंडीत सापडले. बहुदा पुण्यातील प्रभात फिल्म कंपनीच्या मूळ परिसरात १९६० साली भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था सुरु होणार असताना ‘आवाराची साफसफाई’ करतांना हे कागद कचराकुंडीत गेले असावेत.

– – – असो, जोसेफ यांनी ते मौल्यवान कागद २००२-२००४ च्या दरम्यान पुण्यातील भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुरक्षितपणे जतन करण्यासाठी सुपूर्द केले.

मैत्रांनो, ही माहिती वाचल्यावर मला एक गोष्ट ध्यानात आली की ज्या व्यक्तीला ते कागद सापडले तो सिनेक्षेत्राशी जोडलेला होता म्हणून त्याने किमान त्यांची किंमत ओळखली, अन्यथा… अधिक काय बोलणे?

 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈


Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments