वीणा कुलकर्णी

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? जगून घ्या… ?  वीणा कुलकर्णी ☆

उद्या उद्या 

कशाला

आताच 

जगून घ्या…

कशाला पाहिजे चुकले-माकले 

रुसवे मनातले आजच 

मिटवून घ्या…

 

कोण आपले

कोण परके

कसला हा 

भेद…

जिव्हाळ्याच्या नात्यांना 

देऊ नका छेद …..

 

क्षणिक ते 

आयुष्य 

क्षण चार सुखाचे मनसोक्त 

वेचून घ्या…

आनंदाचे रंग आयुष्यात भरून घ्या…..

 

आयुष्य म्हणजे 

सुंदर गाणे

कधी हसणे

कधी रडणे…

कधी आठवणींचे तराणे….

 

म्हणूनच तर..

म्हणूनच तर 

हेच खरं

मनापासून जगून घ्या…

उद्या उद्या कशाला

आनंदाने 

आजच जगून घ्या!!!

☆

© वीणा कुलकर्णी

संपर्क : G.503 ऋतुरंग श्रावण सोसायटी। अरण्येश्वर, पुणे 411 009

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈


Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted