श्री विष्णू सोळंके

? कवितेचा उत्सव ?

☆ भाषा मराठी☆ श्री विष्णू सोळंके ☆

संस्कार, संस्कृती जपते भाषा मराठी

माणसा माणसाला जोडते भाषा मराठी… १

*

चक्रधर, म्हाईंभट सातवाहन आधारवड

संतसाहित्य, ज्ञानेश्वरी जपते भाषा मराठी… २

*

मढैकर, केशवसुत, फुले आणि कुसुमाग्रज

अमृतातेही पैजा जिंकते भाषा मराठी… ३

*

तीन हजार वर्षे जुना तीचा इतिहास

आता अभिजात ठरते भाषा मराठी… ४

*

संस्कृत प्राकृत मागधी पैशाची स्वरूप

शाहिरी पोवाड्यात रंगते भाषा मराठी… ५

*

तुका ज्ञानेश्वर नामदेव जनाबाई मळा

पंढरीत वारीमध्ये नाचते भाषा मराठी… ६

*

माझी माय मराठी माथी अभंग टिळा

संवाद संस्कृती जपते भाषा मराठी… ७

© श्री विष्णू सोळंके

काव्य संध्या, मुदलियारनगर अमरावती ४४४६०६ – मो ७०२०३००८२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments