सौ. जयश्री पाटील
कवितेच्या उत्सव
☆ हत्या / आत्महत्या… ☆ सौ. जयश्री पाटील ☆
☆
वेडी झाले कशी, मलाच हवून बसले
कसली भूल पडली, प्रेम तुझ्यावर केले
*
कळले नाही कसे ते, मधाळ तुझे बोलणे
शब्दात तुझ्या होते, फसवे किती बहाणे
*
ओळखले नाही कसे भाव तुझ्या डोळयातले
दाखविलेस जे मजला, ते भास स्वप्नातले
*
रुबाब तुझा मोठा, मी ही नव्हते कमी
कशी दिली होतीस, सहज खोटी हमी
*
जाळयात तुझ्या अलगद, कशी घावले मी
अडकले पाशात तुझ्या, अन लग्न लावले मी
*
सोने, मोबाईल, गाडी, हौस सारी पुरविली
प्रत्येक सणावेळी, तहान तुझी भागविली
*
हाव होती वाढत्, अंत् नव्हता त्याला
माझ्या रम्य स्वप्नांचा, होता चुराडा झाला
*
धमक्या भीती अनेक जखमा शरीराला
डसत होत्या अनंत वेदना घायाळ मनाला
*
काय करावे कळेना, हतबल होत गेले
बाळाकडे पाहूनही नाही चित्र बदलले
*
आतून मी केव्हाच गेले होते तुटून
हत्या आत्महत्या टाकले जीवन संपवून
☆
© सौ. जयश्री पाटील
विजयनगर.सांगली.
मो.नं.:-8275592044
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





