श्री तुकाराम दादा पाटील
काव्यानंद
☆ तुका म्हणे – अनुतापे दोष… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
☆
अनुतापे दोष /
जात न लागता निमिष//१//
*
परि तो राहे विसावला /
आदी आसवांनी मला //२//
*
हेच प्रायश्चित्त/
अनुतापी न्हाय चित्त //३//
*
तुका म्हणे पापा/
शिवो नये अनुतापा//४//
– संत तुकाराम.
☆
तुका म्हणे
केलेल्या चुकीचा पश्चात्ताप झाल्यावर चुकीचा दोष घालवण्यासाठी एका क्षणाचा कालावधी पुरेसा असतो. पश्चात्ताप वाटल्यानेच माणूस अगदीच शांत होईल आणि शांतच राहील. माणसाच्या मनात पश्चात्ताप भरून रहाणे हेच खरे प्रायश्चित्त आहे. जर असे झाले तर प्रायश्चित्त करणा-याच्या मनात पाप शिरकावच करू शकणार नाही. आपण केलेल्या किंवा आपणाकडून नकळतही झालेल्या चुकांचा आपल्याला खरा पश्चात्ताप झाला असेल तर वाईट गोष्टी करायला लागणारे सगळे दोष आपल्या पासून दूर पळून जातील. त्यामुळे आपल्या कायम व्यस्त असणा-या मनाला विश्रांती मिळेल. मन सतत दग्ध असणे हीच केलेल्या कुकर्मिची खरी शीक्षा असते. मनात जर पश्चात्ताप भरून राहिला असेल तर आपल्या कडून वाईट वर्तन घडणारच नाही. आणि वाईट वर्तन घडले नाही तर पाप आपल्याला चिकटायला येणारच नाही.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






