सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कदंब फुलतो… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वृत्त अनलज्वाला, मात्रा-8+8+8=24) 

गडगडणारा ढग येताना कदंब फुलतो

झरझरणाऱ्या पावसधारा कदंब खुलतो ||ध्रु||

*

वरीसवे हलती त्याच्या धुंद शलाका

यमुनाजळही खळखळ खळखळ देते हाका

कान्हासंगे वृंदावनात खेळ खेळतो

झरझरणाऱ्या पावसधारा कदंब खुलतो ||1||

*
चेंडू सुमने केशर कांती फांदीवरती

कान्हासंगे गोप खेळती अवतीभवती

अमृत प्राशन केल्याने हा अखंड झुलतो 

झरझरणाऱ्या पावसधारा कदंब खुलतो ||2||

*
कदंब-नीला वाहत येतो गंधित वारा

कादंबरीस म्हणती सारे कदंब मदिरा

कुसुमामधला सुगंध त्याचा मंजुळ घुमतो 

झरझरणाऱ्या पावस धारा कदंब खुलतो ||3||

*
सोनवर्खिली मोहक सुमने सुगंध देती

कृष्णसख्याला प्रियक होवुनी जवळी घेती

कदंबोत्सवी मम् शब्दांनी उमल उमलतो

झरझरणाऱ्या पावस धारा कदंब खुलतो ||4||

*
सोन केशरी गुबगुबलेली फुले सुगंधी 

मधमाशांचे मोहळ उठते मिळता संधी

शिशुपाल कुणी कुणी हरिप्रिया म्हणुनी गणतो 

झरझरणाऱ्या पावस धारा कदंब खुलतो ||5||

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments