चित्रकाव्य
वाढलेला मुक्काम – चित्र एक.. काव्ये दोन
श्री प्रमोद वामन वर्तक आणि सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
श्री प्रमोद वामन वर्तक
(१ )
फराळ खाऊन झाला
तरी नाव घेत नाहीस जायचं,
बारा महिने तुझ्यासवे
सांग कसं बरं जगायचं ?
*
रोजच सांजवेळी भिजवण
आम्हाला नाही आवडायचं,
तुझ्या संगतीत किती दिवस
आम्ही आजारी पडायचं ?
*
मान्य आहे आमच्यामुळेच
सारं ऋतुचक्र बदललंय,
पण आता तरी खरं सांग
मुक्काम हलवायचं कधी ठरलंय ?
*
कवी : श्री प्रमोद वामन वर्तक
मानपाडा, ठाणे पश्चिम ४००६१०, मोबाईल – ९८९२५६१०८६
☆
सुश्री नीलांबरी शिर्के
(२)
आवडतो तु म्हटले होते
चुकले का रे !
*
सगळ्या ॠतूतच तुझे येणे
नको नको रे !
*
उन्हाळा हिवाळा ॠतूही
आहेत गरजेचे रे !
त्यांच्यावरती कुरघोडी तव
नको नको रे !
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






