डॉ. मधुवंती कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ काळजाची सावली… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆
(गझल)
☆
तू दिलेल्या वचनांपुढे फिके पडतात ओठही
काळजाच्या सावलीत निर्धास्त होतो जीवही
*
वाट पाहून कंटाळली पाखरे दोन डोळ्यांची
जीव आसावला मग भांबावला काहिली मनाची
*
काळजाची सावली ती लुप्त झाली हृदयातली
सुरु झाली म्हणे अन् संपली माझ्या बहरातली
*
जीव गमाया लागते सुंदर सुशील गाणे म्हणे
रानटी ऐश्वर्य माझे मी जपते जीवापाड म्हणे
*
मी निखारे सर्व ॠतुंचे झेलले पदरात माझ्या
अजूनही धूसर वाट धूर करतो पदरात माझ्या
*
तू नको अगतिक होऊ वैभवाच्या वर्तमानी
जाऊ दे पेटते निखारे सोड तू पदरात माझ्या.
☆
© डॉ. मधुवंती कुलकर्णी
जि.सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





खूप सुंदर