श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ मौनातला पाऊस… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
कसे म्हणावे तू सांग,
ह्या पावसास अर्थहीन.
एकटाच बरसतो जो,
तुझ्यामाझ्या विन.
नाही मेघ वारा वीज,
नाही मयूर नर्तन.
नाही आकांत आक्रोश,
आत्ममग्नी आत्मधून.
कसे सांगू मी तुला,
नको आकाशी पाहूस.
तुझ्या माैनी मनातला,
माझ्या डोळ्यात पाऊस.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




