सौ. वृंदा गंभीर
कवितेचा उत्सव
☆ हाल… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆
☆
अरे पावसा पावसा
किती किती बरसतो
तुझ्या मुळे हाल हाल
शेतकरी जीव देतो
*
पिकं जाती हातातून
कर्ज झालं डोक्यावरी
पोरंबाळ रडतीरं
सततची धारधरी
*
दुष्मणापरी झालासी
पाळवीशी तोंडी घास
घरं झालं सुनं सुनं
धन पैका नसे वास
*
जीनं नको गरिबीचं
मिळू हाती पैक पाणी
देवा राबतो शेतात
आस पुरो चक्रपाणी
*
हातालावी तिथं सोनं
शेतातलं पिकं पिकं
बागायत काळं रानं
अवकाळी मागं भिकं
☆
© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)
न-हे, पुणे. – मो न. 8799843148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




