श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३२९
☆ उन्मात स्पर्श… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
येताच सूर्य ‘मे’चा ही पेटतेय काया
मित्रा तुझ्यात का ती, ती शोधतेय काया
*
हा सूर्य तापलेला करतोय सावळे मज
कृष्णा तुझ्याप्रमाणे ही शोभतेय काया
*
मी अर्घ्य रोज देतो आहे तुला तरीही
घामेजताच सारी का वाळतेय काया
*
स्नायू दुखावल्यावर रगडून अंग घेतो
तेलात ही सुखाने बघ खेळतेय काया
*
थंडी अशी गुलाबी झाली सुरू अचानक
नाजूक ओठ फुटती अन् फाटतेय काया
*
व्याधी व्यथा वयाच्या छळतात रोज आता
डोक्यास बाम रोजच ही मागतेय काया
*
स्पर्शात कालची ती अतृप्त ओढ नाही
उन्मात स्पर्श आता का टाळतेय काया
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





