सौ. सुजाता काळे

☆ कवितेचा उत्सव ☆ बेलगाम सत्य ☆ सौ. सुजाता काळे ☆

जगण्याच्या शर्यतीत धावत होतो,

मरणाच्या वारीस ढकलीत होतो;

कैफियत मांडली लोक दरबारी,

मी शाश्वत सत्यास तुडवित होतो.

 

केल्या कैक मैफिली सुरेल गाण्याचा,

आनंद निरागस शोधित होतो;

सुकलेले गजरे चुरगळले जेव्हा,

मी माज देहाचा उतरवित होतो.

 

हारलो स्वजनांचे चोचले पुरवित,

आभास मृगजळाचा लपवित होतो;

संपलेल्या रात्री शोधल्या पहाटे,

मी हरवलेले क्षण मोजित होतो.

 

भावुक झालो आतुरल्या नात्यात,

प्रतारणेत वेदनेच्या वाहत होतो;

नव्हतेच माझे कळल्यास जेव्हा ,

मी सत्यास बेलगाम दौडवित होतो.

© सुजाता काळे
 8/8/19

पाचगणी, महाराष्ट्र, मोबाईल 9975577684

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments