डॉ. सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “प्रिय @ नेहा…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

☆

 नेहा, तुझा अभिमान आहे 

*

अहिंसेचा लढा तू 

न्यायाचा निर्धार तू 

बापूच्या स्वप्नातील 

सत्याचा आग्रह तू!

*

क्रांतीची मशाल तू 

समतेचा आवाज तू

ज्योतीबाच्या स्वप्नातील 

मूर्तरूप एल्गार तू!

*

धगधगता अंगार तू 

सत्याची जाण तू 

सावित्रीच्या स्वप्नातील 

निर्भय, संकल्प तू!

*

लोकशाही विचार तू 

संविधानाचा अर्थ तू

बाबासाहेबांच्या स्वप्नातील

‘स्त्री’ मनाचे सामर्थ्य तू

*

ओजस्वी देशप्रेम तू,

तळपती शमशेर तू!

भगतसिंगाच्या ध्यासाचा,

धगधगता इन्कलाब तू!

☆

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted