रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? हादग्याची फुले… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

☆

लाल आणि पांढरे

फांदीवर वाकडे

देखणे दिसती 

हादग्याचे आकडे 

*

पानांच्या जाळीत 

झुबक्याने येती

रुपाने रंगाने 

आनंद देती 

*

रिमझिम सरीत 

फांदीवर झुले 

पावसात बहार 

कुंभयोनि खुले 

*
अगस्ती म्हणती 

कुणी बासना याला 

अगासे, केपागेसे

अगस्त्याचा पाला 

*

अनेक नावाचा

फार फार बहुगुणी

निसर्ग देतोय 

राहुयात त्याचे ऋणी

*

आवडती माझी

हादग्याची भाजी 

कवितेत माळली 

फुले ताजी ताजी

☆

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted