श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ शारदारमण गिनीज बुकात ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डकडून येणार्‍या पत्राची शारदारमण मोठ्या आतुरतेने वाट पहात होते. त्यांची इच्छा आहे की पुर्‍या विश्वात सगळ्यात जास्त कविता लिहिणारा कवी या केटॅगरीत त्यांचं नाव नोंदलं जावं. गेल्या वर्षापासून पार्सलद्वारा ते या संस्थेकडे सतत आपल्या कविता पाठवत आहेत. त्यांना पूर्ण विश्वास आहे की एक-न-एक दिवस त्या वर्ल्ड रेकार्डमध्ये त्यांचं नाव नोंदवलं जाईल.

साहित्य लेखनासाठी त्यांनी आपलं नाव `शारदारमण’ यासाठी घेतलेलं नाही कि त्यांच्या पत्नीचं नाव `शारदा’ आहे. ते म्हणतात, ‘कला, विद्या, प्रतिभा यांची देवी `शारदा’  त्यांच्यात रममाण झालीय, म्हणून ते ‘शारदारमण’ आहेत.

गांववाल्यांचं त्यांच्या कवितांच्या बाबतीतलं मत वेगळं आहे. ते म्हणतात, ‘त्यांची कविता म्हणजे, शब्दांचा ढीग फेकलेली कचराकुंडी.’ मत

शारदारमण उठता-बसता,  जागेपाणी- झोपेतही कविता करतात. एक दिवस ते असे झोपले  कि त्यांच्या तप:साधनेला यश मिळाले. `गिनीज बुक…’ च्या वतीने त्यांना एक पत्र मिळाले. त्यात लिहीलं होतं की त्यांचं नाव `गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये समाविष्ट केलं जाईल.  ते हर्षविभोर होऊन उठले, परंतु ते जसजसे पत्र वाचत पुढे गेले, तसतसा त्यांचा  आनंद, हर्ष, उल्हास फुग्याप्रमाणे खाली येत येत एकदम फुस्स… होऊन गेला.

त्यात लिहीलं होतं, `आपलं नाव विश्वविक्रमासाठी नोंदवलं जाणार आहे, पण एका वर्षात जास्तीत जास्त शब्द लिहिणारी व्यक्ती म्हणून ते समाविष्ट केलं जाईल. आम्हाला खेद आहे की अधिकाधिक कविता लिहिणारा कवी म्हणून आपल्या नावाची नोंद होऊ शकत नाही. आपण लिहीलेल्या शब्दांमध्ये कुठलंही काव्य, कविता जाणणार्‍या मर्मज्ञांना जाणवलं नाही. त्यामुळे अधिकाधिक शब्द लिहिणारी व्यक्ती म्हणून ते समाविष्ट करत आहोत.

पुढे लिहीलं होतं –

आमच्याकडे सगळ्यात मोठा कागदांचा जो संग्रह आहे, तो ब्रिटीश पार्लमेंटरी कागदांचा आहे.  त्याचं वजन पावणे चार टन है। आपण पाठवलेल्या कागदांचं वजन सव्वा पाच टन आहे. आजपर्यन्त आमच्याकडे आलेली सगळ्यात मोठी कादंबरी २०,७०,००० शब्दांची आहे. त्याचे २७ व्हॉल्युम्स आहेत. ती लिहायला ४ वर्षे लागली. आपण एकाच वर्षात  ४०, ४०, ००० शब्द लिहीले आहेत. तेव्हा एका  वर्षात जास्तीत जास्त शब्द लिहिणारी व्यक्ति या विभागात आपलं नाव आम्ही नोंदवत आहोत.  अधिकाधिक कविता लिहिणारी व्यक्ति या  विभागात आपलं नाव आम्हाला नोंदवता येणार नाही. क्षमस्व.

`हरामखोर स्साले…’ शारदारमण उसळून म्हणाले आणि धम्मकान सोफ्यावर पडले.

© श्रीमती उज्ज्वला केळकर  

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments