श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆  आपली दिवाळी आणि पशुपक्ष्यांचा शिमगा ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

परवा म्हणजे रविवारी आपण सगळ्यांनीच लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम खूप आनंदात साजरा केला असणार.

काल नेहेमीप्रमाणे सकाळी मृत्युंजय मंदिराकडे फिरायला बाहेर पडलो. दिवाळीमुळे मैत्रिणी मनवा मेघना यांची भेट होण्याची शक्यता फारच कमी होती.

फिरण्याच्या रस्त्यावर मारुतीचे एक देऊळ आहे. मंदिराच्या दाराजवळच. बाहेर एक मोठा फळा लावलेला आहे. त्यावर नेहेमी सुविचार लिहिलेले असतात. मला सुविचार वाचायला नेहेमीच आवडते. मी अगदी रोज फळ्यावरचा सुविचार वाचायला हमखास तिथे थांबतो. काही काही सुविचार. खरंच सुंदर असतात आणि हमखास ते मनात मुरतात आणि मग आपोआप आचरणात उतरतात. हा माझा अनुभव. उदाहरणादाखल तिथे वाचण्यात आलेले काही सुविचार असे होते — 

  • जो नेहेमीच दुसऱ्याच्या सावलीत वावरतो. तो स्वतःची सावली कधीच निर्माण करू शकत नाही. स्वतःची सावली निर्माण करायला – आपल्याला उन्हात यावेच लागते.
  • आपले सुख किंवा दुःख. सभोवतालच्या परिस्थितीपेक्षा. स्वतःच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असते.
  • विषय किती वाढवावा. कुठे थांबवावा. कुठे दुर्लक्ष करावे. हे ज्याला समजले. तो आयुष्यात कुठल्याही परिस्थितीशी सामना करू शकतो.

आज फळ्यावर बघितलं तर पहिलं वाक्य चक्क इंग्रजीत होतं आणि खाली निरनिराळ्या अक्षरात उत्तरादाखल बरेच संदेश लिहिलेले होते. सुविचार लिहिण्याच्या फळ्यावर हा प्रकार नविनच होता. हे काय नवीन आहे. म्हणून मी वाचायला सुरवात केली —–

# Please Save us from loud noise and smoke.

We can not tolerate it. Please help us!!

खाली काही पक्षी. प्राणी यांची चित्रे होती.

बहुदा या पक्षांनी आणि प्राण्यांनी काल रात्री हे फळ्यावर हे लिहिले असावे. आणि सगळ्यांनाच वाचता यावे. म्हणून कदाचित. आपली व्यथा त्यांनी इंग्रजीत लिहिली असावी.

वाचून खूप वाईट वाटले. रस्त्यावर कानठळ्या बसवणारे आणि धूर ओकणारे फटाके फुटत असतानाची दृश्य डोळ्यासमोरून जायला लागली – घाबरून उडणारे पक्षी दिसायला लागले – गांगरून पळणारी कुत्री. मांजरं. गायी दिसायला लागल्या. या मुक्या प्राण्यांचे काय हाल होत असतील. ही कल्पना पण करणं कठीण आहे. कुत्र्याच्या / गाढवाच्या शेपटाला फटाक्याची लड लावणारे महाभाग पण दिसायला लागले. मनात विचार आला. लोक हॉस्पिटलच्या समोर फटाके लावतात. आसपासच्या घरात आजारी माणसे असली. तरी घरासमोर फटाके लावतात. हे लोक पक्षी आणि प्राणी यांची काय तमा बाळगणार! ज्या पक्षांमुळे. प्राण्यांमुळे. जीवजंतूंमुळे आणि वृक्षांमुळे आपल्या सभोवतालची सृष्टी संतुलित राहते आणि त्यामुळेच आपण जीवन आनंदात जगू शकतो. त्यांना आपल्या मदतीची अशी याचना करावी लागते आहे. हे वाचून खूप वाईट वाटले.

मी पुढचे संदेश वाचायला लागलो —

काही वाचकांनी आज सकाळीच आपली मते मांडली होती —

# Dear birds and animals – sorry to say that your request will remain on this board only. सणासुदीच्या दिवसात. कुणीही कुणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. आम्ही हा त्रास सहन करतो. तसा तुम्ही पण सहन करायला शिका. We have no choice and you too are sailing in the same boat.

Your helpless friends – मेघना

 # Dear birds and animals – sorry to learn your pains. मनवा यांनी लिहिले आहे. ते बरोबरच आहे. कुणाला सांगणे. म्हणजे ‘पालथ्या घड्यावर पाणी ओतणे’ असा प्रकार आहे. हेल्पलेस परिस्थितीतून जेव्हा आपल्याला जावे लागते. तेव्हा संतांचे वचन आठवून शांत रहावे. “जे जे होईलं ते ते पाहावे (म्हणजे कानठळ्या सोसाव्या. धुराचा श्वास घ्यावा). पण चित्ती असू द्यावे समाधान”. आम्ही हेच करतो.

Your friend – मनवा 

# Dear birds and animals – आपकी तकलीफ पढकर बहुत दुख हुआ. यहा पर उपरसें आये ऑर्डर भी माननेके लिये पब्लिक तैयार नही है. आप और हम किस पेड की पत्ती है. आपकी कौन सुनेगा 

आपका मित्र – शर्मा

# Dear birds and animals – शर्मा म्हणतात ती वस्तुस्थिती आहे. लोक कुणाचेही याबाबतीत ऐकायला तयार नाहीत हे खरेच आहे. लोकांचे म्हणणे असे आहे. सणवार कसे साजरे करावेत. फटाके उडवावे. का उडवू नयेत / कुठले उडवावे / केंव्हा उडवावे / किती उडवावे / कुठे उडवावे. ढोल ताशे/ डीजे वाजवावे का – किती वाजवावे / नाच गाणी कितीवेळ करावी वगैरे वगैरे. यामध्ये कुणिही पडू नये.

त्यामुळे तुम्ही कुणावर अवलंबून राहू नका. तुम्हाला कोणीही वाली नाही. Sorry.

तुमची मैत्रीण – सुनैना 

# Dear birds and animals – मी तुमच्या दुःखात सहभागी आहे. खरंतर तुमच्या मदतीकरता प्राणी मित्र. पक्षी मित्र. वृक्ष मित्र अशा खूप संस्था आहेत. पण कान बधिर करणाऱ्या आवाजांमुळे आणि विषारी धुरामुळे. त्यांचे सदस्यच परेशान आहेत. त्यामुळे अशावेळेस त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा करणे चुकीचेच वाटते. पण काहीतरी मार्ग तर काढायलाच पाहिजे. संध्यातरी मला दोनच पर्याय दिसत आहेत — 

१) आलीया भोगासी असावे सादरं. चित्ती असू द्यावे समाधानं. अशी मनाची तयारी करायला सुरुवात करा. यातून काहीतरी मार्ग हा असणारच. “शोधा म्हणजे सापडेल” अशी आमच्याकडे म्हण आहे. म्हणजे यात तथ्य हे नक्की असणारच. तुम्ही शोधात राहा. मी पण शोधते.

२) आपल्याला इथे नोकरी मिळू शकत नाही. हे समजल्यावर जसे बरेच जण परदेशात पलायन करतात. तसेच इथून स्थलांतरित होण्याचे काहीतरी बघा. परदेशात जाता आले तर उत्तम. कारण तिथे प्राणी आणि पक्षी यांची कदर केली जाते. निसर्गाचा समतोल. पशु / पक्षी / कीटक यांच्यामुळेच साधतो. हे त्यांना समजते व त्याप्रमाणे ते वागतात. परदेशात जमत नसेल. तर लहान खेडेगावात पलायन करा. “दगडापेक्षा वीट मऊ” असे म्हणतात. Very very sorry.

तुमची मैत्रीण – वसुंधरा

हे सगळे वाचून. आपण सगळेच किती हेल्पलेस आहोत. याची जाणीव झाली. पूर्वी दिवाळीत फटाके उडायचे. पण ते आजच्या तुलनेत अगदी साधे असायचे. थोडासा आवाज / थोडासा धूर / थोडासा रंगीबेरंगी प्रकाश. हे सगळे डोळ्यांना आणि कानाला मजा देऊन जायचे. मजा यायची.

जमाना बदलतोय. माणसे बदलतायत. फटाके बदलतायत. फटाक्यांची विक्री आता वर्षभर सुरु असते. काहीतरी कारण शोधायचं आणि फटाके फोडायचे. हेच सत्र सध्या सुरु आहे.

आपण हेल्पलेस झालो. कि नेहेमी देवाकडे धाव घेतो. मी विचार केला. इथे तर देव अगदीच समोर आहे. म्हणजे त्याच्याकडे पोहोचायला. धाव घेण्याची पण जरूर नाही.

मी आत मंदिरात गेलो. हात जोडले आणि देवाला म्हणालो – माणसानी असे वेडेवाकडे फटाके बनवणे. ते वर्षभर उडवणे. याची बिचाऱ्या पक्षांना / पशूंना शिक्षा मिळायला नको? त्यांच्याकरता काही तरी कर. ही मनापासून तुला प्रार्थना आहे. वयस्कर मंडळी. आजारी मंडळी. लहान बालके. आणि फटाके उडवणाऱ्यांसकट सगळेजण. यांना पण ही शिक्षाच आहे. काहीतरी उपाययोजना कर आणि हे थांबव. कमी कर.

प्रार्थना करून मी बाहेर पडलो. असं म्हणतात. कि पशु पक्षांना थर्ड सेन्स असतो. त्यांचे हितचिंतक कोण आहेत. वगैरे त्यांना कळतं. आपल्या हितचिंतकाला ते धन्यवाद देण्याचा नेहेमीच प्रयत्न करतात.

मी मंदिराच्या बाहेर पडलो. फुटपाथ वरची २-३ कुत्री माझ्या पाया – पायाशी करायला लागली. आणि नाजूक आवाजात भुंकायला लागली. बहुदा त्यांना मला थँक्स म्हणायचे असावे. मी त्यांच्या डोक्यावर हात फिरवला आणि पुढे निघालो. थोडं पुढे मृत्युंजय मंदिर आहे. तिथे फुटपाथवर खूप कबुतरे असतात. आपण जवळ गेलो. कि सगळी उडतात. आज मी तिथून चालत जातांना. एकही कबुतर उडून गेले नाही. त्यांना माझ्या पायाशी यायचे होते. असा भास झाला. एकतर माझ्या खांद्यावर बसले आणि उडून गेले. सगळ्यांनाच माझे आभार मानायचे असावेत. घरापर्यंत पोहोचलो. केंव्हातरी दर्शन देणारा भारद्वाज पक्षी. चक्क गेटवर बसून धन्यवाद देण्याकरता माझी वाटच बघत असावा. मला बघताच तो उडून गेला. मी सगळ्यांना मनापासून नमस्कार केला.

हे सगळं वाचून. आपण सगळ्यांनीच. या संदर्भात काहीतरी सकारात्मक करायचंच. असं मनाशी ठरवलं. तर देवाच्या कृपेने. आपल्याला अशक्य असे काहीच नाही. आणि कुठलाही बदल हा आपण नक्कीच घडवू शकतो.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted