सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २८३ ?

☆ गझल… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

मी मानले स्वतःला गंधाळता धुलीकण,

सारे समग्र जीवन केले तुलाच अर्पण

*

त्या पावसात जाता,वारा मुजोर झाला,

सारे ऋतू सुखाचे मी ठेवलेत तारण!

*

गेल्या बुजून तेव्हा साऱ्या वसंतवाटा,

मग शुष्क भावनांनी केली पुन्हा भलावण!

*

नाही,नको म्हणाले घेण्यास उंच झोका,

आकाश चांदण्याचे त्याने दिलेच आंदण!

*

आल्या फुलून बागा,वणवा विझून जाता,

आयुष्य सांजवेळी झाले कसे विलक्षण!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
3 2 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुभाष

गझलकारिणी तु शब्दांची करिसी जादू
अर्पण करीसी समग्र जीवन..नकळे कुण्या पामरासाठी
सुख सारे ठेवीसी तारण..शुष्क भावनांची साहूनी भुलावण…
टाळलासी तु उंचच झोका मिळाले तुला आकाशच आंदण..
वणवा विझला कळे न कसला , घडले कसे विलक्षण…
आमच्यासाठी तर तु खरोखर खरी विलक्षण..
सांजवेळ ही आयुष्याची.. तु आणि आम्ही एक सर्वजण..
सुखद जाणीवा.. आणिक भरलेपण..

Prabha Sonawane

धन्यवाद सुभाष, काव्यमय सुंदर प्रतिसाद!

Prabha Sonawane

धन्यवाद सुभाष! काव्यमय सुंदर प्रतिसाद!