सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # २९४
☆ तरही… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
(ओळीसाठी डॉ.कैलास गायकवाड यांचे आभार )
☆
चंद्रा इतका मोहक हा चेहरा असावा
माझ्या मधला खोटा सुद्धा खरा असावा
*
पाहू कशास दर्पण,माझ्या मनात छाया
हे बिंब जळातील नितळ पोहरा असावा
*
आडामधले पाणी सुद्धा अमृत वाटे
त्याच्या खाली पुण्याईचा झरा असावा
*
समजत नाही स्वतःस कोणी महान मीही
थोडासा पण, हा आवाका बरा असावा
*
इवलेसे हे अस्तित्व अधिक छान भासते
आयुष्याचा हा छोटा कोपरा असावा
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





