सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २९४ ?

☆ तरही… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(ओळीसाठी डॉ.कैलास गायकवाड यांचे आभार )

 

चंद्रा इतका मोहक हा चेहरा असावा

माझ्या मधला खोटा सुद्धा खरा असावा

पाहू कशास दर्पण,माझ्या मनात छाया

 हे बिंब जळातील नितळ पोहरा असावा

 *

आडामधले पाणी सुद्धा अमृत वाटे

त्याच्या खाली पुण्याईचा झरा असावा

 *

समजत नाही स्वतःस कोणी महान मीही

थोडासा पणहा आवाका  बरा असावा

 *

 इवलेसे हे अस्तित्व अधिक छान भासते

आयुष्याचा हा छोटा कोपरा असावा

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments