सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “सौंदर्य : शरीराचे आणि मनाचे” – लेखिका : श्रीमती भावना ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

एक अतिशय सुंदर महिलेने विमानात प्रवेश केला आणि आपली सीट शोधण्यासाठी इथे-तिथे नजर फिरवली.

तिला दिसलं की तिची सीट दोन्ही हात नसलेल्या एका व्यक्तीच्या शेजारी होती.

त्या अपंग व्यक्तीजवळ बसायला तिला संकोच वाटला.

ती ‘सुंदर’ महिला एअरहोस्टेसला म्हणाली,

“मी या सीटवर आरामात प्रवास करू शकणार नाही, कारण माझ्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला दोन्ही हात नाहीत. ”

तिने सीट बदलण्याची विनंती केली.

 

हे ऐकून एअरहोस्टेस थोडी अस्वस्थ झाली आणि तिने विचारलं —

“मॅडम, कृपया कारण सांगाल का? ”

त्या महिलेने उत्तर दिलं—

“मला असे लोक आवडत नाहीत. अशा व्यक्तीजवळ बसून मी प्रवास करू शकत नाही. ”

दिसायला सुशिक्षित आणि सभ्य वाटणाऱ्या महिलेचे हे शब्द ऐकून एअरहोस्टेस अचंबित झाली.

महिलेने पुन्हा ठामपणे सांगितलं—

“मी त्या सीटवर बसणार नाही, मला दुसरी सीट द्या. ”

एअरहोस्टेसने आजूबाजूला पाहिलं,

पण इकोनॉमी क्लासमध्ये एकही सीट रिकामी नव्हती.

ती म्हणाली —

“मॅडम, येथे सीट उपलब्ध नाही, पण प्रवाशांच्या सोयीची जबाबदारी आमची आहे. मी कॅप्टनशी बोलते, कृपया थोडा संयम ठेवा. ”

थोड्या वेळाने परत येऊन ती म्हणाली —

“मॅडम, तुम्हाला झालेल्या असुविधेबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

या संपूर्ण विमानात फक्त एकच सीट रिकामी आहे — ती फर्स्ट क्लासमध्ये.

आमच्या कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच

इकोनॉमीमधील प्रवाशाला फर्स्ट क्लासमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ”

हे ऐकून त्या ‘सुंदर’ महिलेला खूप आनंद झाला.

पण ती काही बोलणार इतक्यातच…

एअरहोस्टेस त्या अपंग व्यक्तीकडे गेली आणि आदराने म्हणाली —

“सर, आपण फर्स्ट क्लासमध्ये जाल का?

कारण आम्हाला नाही वाटत की आपण एखाद्या असभ्य प्रवाशासोबत प्रवास करून त्रास सहन करावा. ”

हे ऐकताच संपूर्ण विमानात टाळ्यांचा कडकडाट झाला.

 

ती अतिशय सुंदर दिसणारी महिला आता लाजेने मान खाली घालून बसली होती.

तेव्हा तो अपंग माणूस उभा राहून म्हणाला,

“मी एक माजी सैनिक आहे. कश्मीर सीमेवरील एका ऑपरेशनदरम्यान

बॉम्बस्फोटात माझे दोन्ही हात गेले.

सुरुवातीला या देवींचे शब्द ऐकून मला वाटले —’मी नेमके कोणाच्या सुरक्षिततेसाठी माझे हात गमावले? ‘

पण आज तुम्हा सर्वांची प्रतिक्रिया पाहून

मला स्वतःचा अभिमान वाटतो की मी माझ्या देशासाठी आणि देशवासीयांसाठी माझे दोन्ही हात गमावले. ” असे म्हणून ते फर्स्ट क्लासमध्ये गेले.

ती ‘सुंदर’ महिला मात्र पूर्णपणे अपमानित होऊन आपल्या सीटवर शांत बसून राहिली.

मर्म : विचारांमध्ये उदारता नसेल तर केवळ सुंदरतेला काहीच मूल्य नसते.  

लेखिका: श्रीमती भावना

प्रस्तुती: सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments