शशी नाडकर्णी-नाईक
वाचताना वेचलेले
☆ “जूनचा पाऊस व –जून” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆
☆
‘जून’ महिना संपत आला…
पण अ’जून’ पावसाचा पत्ता नाही…
असं वाटतं की भि’जून’जावं…
मो’जून’ दोन चार थेंब पडतात…
अंग भा’जून’ जातंय…
चेहरा कोमे’जून’ गेलाय…
कुठे स’जून’ जाता येत नाही…
रात्री १२ वा’जून’ गेले तरी झोप येत नाही..
अरे जरा त्या पावसाला सम’जून’ घ्याना.काँक्रिट जमिनीत विर’जून’ रस्ते करतात. नगरी redevelopment मुळे निळ्या प्लॅस्टिक आणि पत्र्यांनी स’जून’ गेली.
पाणी जमिनीत न जाता ला’जून’ वरच राहतं.
सगळी सृष्टी भा’जून’ शि’जून’ कोमे’जून’ गेली. समुद्रात जायला पाणीच नाही.
मनुष्याचे कर्म फिरून त्यालाच फळ देते. ढग तरी कसे गर’जून’ (गर्जून )पडणार ?तो गरीब बिच्चारा पाऊस येणार कोठून?
सगळे वातावरण प्रदूषणाने पिं’जून’ गेले आहे.
जीवन थि’जून’ गेलंय रे पावसा!
आता मा’जून’ जाऊ नकोस.
लवकर ये.
☆
लेखक:अज्ञात
प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






