श्री जगदीश काबरे
मनमंजुषेतून
☆ “नजर बदला, विचार बदलतील…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
☆
जेव्हा आपले ‘आदर्श’ बदलतात,
तेव्हा आपले ‘विचार’ बदलतात.
जेव्हा ‘विचार’ बदलतात,
तेव्हा ‘विचार करण्याची पद्धत’ बदलते.
जेव्हा ‘विचार करण्याची पद्धत’ बदलते,
तेव्हा आपली ‘मानसिकता’ बदलते.
जेव्हा ‘मानसिकता’ बदलते,
तेव्हा आपला ‘तर्क’ बदलतो.
जेव्हा आपला ‘तर्क’ आणि ‘युक्तिवाद’ बदलतो,
तेव्हा आपण ‘चिकित्से’ला द्वेष समजू लागतो.
पण जेव्हा आपण प्रश्न विचारतो,
तेव्हा आपल्यामध्ये चर्चा होते.
जेव्हा आपल्यामध्ये ‘चर्चा’ होते,
तेव्हा ‘बरोबर आणि चूक’ कळू लागते.
एकदा का आपल्याला ‘बरोबर आणि चुक’ कळू लागलं की,
आपण आपले ‘हक्क आणि विशेषाधिकार’ मिळवण्यासाठी ‘बंड’ करतो.
© श्री जगदीश काबरे
(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)
jetjagdish@gmail. com
मो ९९२०१९७६८०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





