श्री प्रमोद वामन वर्तक
चित्रकाव्य
न ज र!..
श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
डोळे रोखून मजवर
काल पहिले पावसाने
अंग अंग माझे सारे
शहारले त्या नजरेने
*
भाव पाहून डोळ्यातले
थांग तयांचा लागेना
काय भरला अर्थ त्यात
मज काहीच उमगेना
*
दिली नजर नजरेला
धीर करून एकदाचा
हळूच उलगडला अर्थ
डबडबलेल्या डोळ्यांचा
*
“आयुष्य जरी क्षणिक
खंत ना कसली मनी
फुलवून साऱ्या चरचरा
होतो समाधानाचा धनी
होतो समाधानाचा धनी”
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






