सौ. नीला देवल

☆ जीवनरंग ☆ दोन डबे ☆ सौ. नीला देवल ☆

राजू आज फार खुश होता. राकेश उर्फ रॉकी सारखाच स्पायडर मॅन चे चित्र असलेला, काल स्पर्धेत बक्षिस मिळालेला टिफिन चा डबा घेऊन तो शाळेत आला होता मधल्या सुट्टीत त्याने खाण्यासाठी डबा उघडला तर आतील ब्रेड जाम बघून तो रॉकी कडे धावला.  “रॉकी थांब डब्याची आदला बदल झाली आहे. हा घे तुझा डबा”. येवढे म्हणे तो रॉकी ने राजुचा डबा खायला सुर वात ही केली होती. “असु दे, आज माझा डबा तू खा, तुझा डबा मी खातो”. राजूने ब्रेड जाम खाल्ले तर रॉकी ने पोळी भाजी चाटून पुसून खाऊन टाकली.

दुसरे दिवशी रॉकी हट्टाने म्हणाला “राजू आज पण तुझा डबा मी च खाणार”. राजुच्या डब्यातील भाकरी, मेथीची भाजी लिंबाचं लोणचं रॉकी ने संपवले. त्रतोठरा बसणारा पाव जाम खावून राजूला भूक भागवावी लागली.   ओ लीने चार दिवस पवाचे तुकडे खाऊन राजूला वीट आला. दुसरे दिवशी त्याने आपला डबा रॉकी कडून हिसकावून घेतला. “तुझा डबा तू खा. तुझा पाव जाम नको मला. वीट आला त्याचा. कोरड कोरड खाऊन भूक भागत नाही माझी. जाम सुध्धा अगोडच लागतोय. माझ्या आईच्या भाजी भाकरी पुढे.” “होय रे राजू तुझ्या डब्यातल्या भाजी भाकरीची रोज एक नवीन च पण मस्त चव असते. भाकरी भाजी तिखट असूनही चवता चावता इतकी मस्त गोड होऊन जाते की बस!” ती भाकरी खाताना कमीच पडते. आता तुझा डबा रोज मीच खाणार सांगून ठेवतो तुला”. “रॉकी नको, नको माझा डबा मलाच हवा. तुझ्या विकतच्या ब्रेड जमला माझ्या आईच्या भाजी भाकरी ची चव कशी येणार?”

दोघांचे भांडण  शिक्षकानं पर्यंत गेले, “सर हा रॉकी माझा डबा रोज जबदस्तीने घेऊन खातो आणि मला त्याच्या डब्यातील पावाचे तुकडे मला खायला लावतो. मला पाव खावून  कंटाळा आला. शिवाय भूक भागत नाही ते वेगळेच” राजू म्हणाला. “पण तुझ्या डब्यातील भाकरी, पोळी भाजी खाऊन माझी भूक आणखीनच वाढत जाते. भाकरी कमीच पडते. असे वाटते.” सर म्हणाले,”रॉकी तुझ्या आईला तू पोळी भाजी द्यायला का नाही सांगत?”  सर तिला तिच्या लॅपटॉपच्या सततच्या कामातून सवड मिळत नाही. नोकरणी डबा देते. मग मलाही ब्रेड खाऊन खाऊन कंटाळा येतो ना!”

“बरोबर आहे. पण दुसऱ्याचा डबा खाणे योग्य नाही. ब्रेड विकणाऱ्या बेकरी वाल्यांना फ्कत पाईषाशी मतलब. तो पाव, केक खा नाही तर फेकून द्या त्यांना काहीच फरक नाही पडत. पण आई भाजी भाकरी, पोळी करताना आपल्या  मुलाने ती खावी, त्याच्या अंगाला ते जेवण लागून त्याने  धश्ट पुष्ट्ट, बलवान बनाव म्हणून मायेच्या, प्रेमाच्या हातानं त्यात तिखट मीठ घालतांना ममतेची गोडी ही त्यात ती घालत असते. म्हणून ती भाजी भाकरी चवीष्ट होऊन गोड मधूर होऊन जाते. त्यात   तिचे निस्वार्थी प्रेम असते. पै शाचा संभंध नसतो. रॉकी तुझा डबा फकत पैं सा , व्यवहार याने भरलेला असतो तर राजुचा डबा माया ममता  आणि निस्वार्थी प्रेम याने भरलेला असतो. असो. उद्या दोघांनी स्वतःचेच डबे खायचे. नाही तर मी शिक्षा करीन. अशी ताकी त देऊन सर गेले.

दुसरे दिवशी मधल्या सुट्टीत राजूने आपला डबा उघडला. पण रॉकी ने डबा उघडला च नाही. रडवेल्या डोळयांनी तो स्वताच्या बंद डब्या कडे  नुसताच बघत बसून राहिला.”  रॉकी,

 

© सौ. नीला देवल

९६७३०१२०९०

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Shankar N Kulkarni

खुप कांही सांगुन जााणारी छोटीशी कथा.