सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
☆ वाट हळदुली झाली… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के☆☆
आभाळ भरून आलं
धरती भरात आली
पाऊस भूमी मिलना
वाट हळदुली झाली
*
हळदीच्या पखरणीने
जमीन दिसते देखणी
नव्हाळी चढे अंगावर
या फुलांच्या पखरणी
*
की वाट जाहली ही
जेजुरी गडाची वाट
खंडेरायाचा भंडारा
भक्ते उधळला दाट
*
वाट जेजुरीची हिच
हीच म्हाळसाईची वाट
जाता पुढेच लागेल
असा बाणाईचा घाट
*
या पिवळ्याची जादू
त्याच्या रंगातुन बोले
पीत फुलांची पखरण
किती आठवात आले !
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈