श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ आधार… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
कांहीच कळेना मजला,
हे असे कसे का व्हावे.
कोणत्या तरी स्मरणाने,
मी व्याकूळ होउन जावे.
थोडेच असे असते की,
मातेनेच गावी अंगाई.
गहिवराने कोणत्याही,
मज नीज लोचनी येई.
अभिसार कोणता शोधू,
हरवल्या संहितेचा.
उन्मन मनाला आता,
आधार फक्त कवितेचा.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




