मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्वप्न येईल सत्यात… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? स्वप्न येईल सत्यात... ? सौ शालिनी जोशी ☆

☆

 सकाळच्या या वेळी

 तिरीप दारी किरणांची

 उंबऱ्याशी बसून आजी

 दिसे वाट पाहे कोणाची – – 

*

 वेळ ही गडबडीची

 परी आजी दिसे निवांत

 चिंतेची रेषा उमटली

 चेहऱ्यावरच्या सुरकुत्यात – – 

*

 घरात सारा शुकशुकाट

 सारी मुलेबाळे पांगली

 पोटासाठी दूर देशी

 जाऊन असावी स्थिरावली – – 

*

 चौकट वाड्याची रंगीबेरंगी

 साक्ष गत वैभवाची 

 गजबज होती मुलामाणसांची

 आणि हालचाल पाहुण्यांची – – 

*

 वेळ पुरत नव्हता आजीला

 शेती घर सांभाळताना 

 आता राहिली एकटी

 घर तिला सोडवेना – – 

*

 भाकरीची चवड थापून

 खरखरीत आजीचे हात

 आता कोणासाठी रांधावे

 प्रश्नाला उत्तर नव्हते सापडत – – 

*

 सर्वच खेड्यांची ही व्यथा

 करू आशा होईल दूर

 येतील नवीन लघुउद्योग

 खेड्यात शेतीबरोबर – – 

*

 खेडीच होतील नंदनवन 

 नव वैभव होईल प्राप्त

 आजीचे स्वप्न येईल सत्यात

 जय किसान जय नवभारत – –

☆

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ क्षणार्धात संपला, सुंदर स्वप्नांचा डाव ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? क्षणार्धात संपला, सुंदर स्वप्नांचा डाव ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

निष्पाप निरागस,

जीव तीन कोवळे |

झडप काळाची,

पाणावलेत डोळे |

*

सुंदर फुलण्याआधीच,

काळाने कळ्या तोडल्या |

क्रूर निष्ठुर नियतीने,

अग्नीकुंडात जाळल्या |

*

निरागस नजर,

निरागस त्यातले भाव |

क्षणार्धात संपला,

सुंदर स्वप्नांचा डाव |

*

मृत्यू म्हणजे काय,

समजण्यापलीकडचे वय |

गाठले मृत्यूने त्यांना,

कशाचीही नाही केली गय |

*

हसतं खेळतं कुटुंब,

क्षणात झालं उध्वस्त |

अग्नीच्या ज्वाळांनी,

क्षणात केलं फस्त |

*

सांग ना गं नियती,

इतकी निष्ठुर का वागली |

गोऱ्या गोबऱ्या गालांवरची,

लाली कशी ना तुज उमगली |

*

वज्राहून कठोर हृदये,

ती देखील पिळवटलीत |

पाहून मृत्यूचे थैमान,

करोडो मनं हळहळलीत |

*

शेवटचा गोड हा सेल्फी,

लावून गेला जीवाला खंत |

वैरी जरी असला कोणी,

नसावा त्याचा असा अंत |

☆

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

दि. 14 जून 2025

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दिसतं तसं नसतं हो… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? दिसतं तसं नसतं हो…  ?  सुश्री नीलांबरी शिर्के ☆

☆

असणं आणि दिसणं यात

खूप काही फरक असतो

फोटोमधे बघत असता

 प्रामुख्याने तो जाणवतो

*

नरम मुलायम रेशीम रेती

त्यावर हटयोग करे युवती

निरखुनी पहाता सारे कळते

समजुन येते आपली फजिती

*

दृष्टीभ्रम हा असेल अथवा

युक्ति फोटो काढायाची 

म्हणून मत देण्याआधीच

सवय करावी निरखायाची

☆

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – पाऊस आला रे SSSSS…! – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे + संपादकीय निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

💐 अ भि नं द न 💐

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ.ज्योत्स्ना तानवडे  यांना मनस्पर्शी साहित्य प्रतिष्ठान ने सन्मानित केले आहे. प्रतिष्ठानच्या लेखन उपक्रमात साप्ताहिक कविता आणि मासिक लेख वर्षभर लिहिल्याबद्दल सातत्यपूर्ण उत्तम लेखनाचा विशेष  पुरस्कार  त्यांना प्राप्त झाला आहे.

ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे सौ.तानवडे यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐

आजच्या अंकात वाचूया सुश्री ज्योत्स्ना तानवडे चा चित्रकाव्य – पाऊस आला रे SSSSS…! 

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

☆ ☆ ☆ ☆ ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – पाऊस आला रे SSSSS…! – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

☆

आला पाऊस झिम्माड 

मैदानात पाणी पाणी 

पाण्यामध्ये नाचताना 

मुले गाती गोड गाणी ||

*

गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्यात 

येरे येरे तू पावसा 

छत्री उंच उडवूनी 

मुक्त भेटती पावसा ||

*

पावसात भिजण्याची 

मजा वाटे किती न्यारी 

भिजवती एकमेका 

थयथय नाच भारी ||

*

मुले आणि पावसाची 

घट्ट मैत्री आनंदाची 

धुंदी झिरपे मनात 

आठवण आयुष्याची ||

☆

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मोहरलेला गुलमोहर तू… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मोहरलेला गुलमोहर तू… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

☆

मोहरलेला गुलमोहर तू 

मी तव् रसिक निराळी

पुष्पदलांनी तुझ्या लाविले 

हळदी कुंकू मम् भाळी 

कधी सडा तू अंगांगावर

टाकलास प्रेमाने

रूप तुझे पाहूनच कवने

सुचली मज नेमाने

तुझ्या रूपाने वाटा सजल्या 

नखशिखांत मोहरल्या

पायघड्या तू घालत गेला 

रोम रोम थरथरल्या

प्रीत कुणाची तव् छायेतच 

बहरून बहरून गेली

तुझ्या सवे रे पवन झिंगला

धुंद भ्रमंती केली

वाटा झाल्या शोभिवंत जणू

फुलदाण्या फुललेल्या 

लाल जांभळ्या आणि केशरी

रंगरंगी खुललेल्या

निलमोहर म्हणती कोणी 

गगनाचा रहिवासी

सुंगंधासही भुरळ पडावी 

रंगांची मखलाशी

मोराचे फुल कोणी म्हणती 

कोणी जंगलची ज्वाला

मनोमनी रुजतो जणू कान्हा

कृष्णचुडा म्हणती त्याला

कडेकपारी डोंगररांगा 

गुलमोहराने सजल्या

कविता होऊन शब्द फुलांनी 

मनात माझ्या रूजल्या

☆

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ढोरं तरी बरी। वर्तनात ॥ ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ढोरं तरी बरी। वर्तनात ॥ ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

अठरा वर्षांनी | पाळणा हलला |

आरसीबी झाला | जेतेपदी ||१||

*
बंगळूर मध्ये | विजयी आनंद |

क्रीडा प्रेम धुंद | विजयात ||२||

*

विना नियोजन | विजयाची यात्रा |

उत्साहाची मात्रा | अतिरेक ||३||

*

उसळली गर्दी | चेंगराचेंगरी |

अनागोंदी सारी | भोवताली ||४||

*

निष्पाप लोकांचे | नाहकच बळी |

मृत्यू अवकाळी | नशिबासी ||५||

*

क्रिकेटपटूंना | प्रसिद्धी व पैसा |

सामान्यांचा कैसा | जीव गेला ||६||

*

माणूस तो ऐके | फक्त ज्ञानेश्वरी |

ढोरं तरी बरी | वर्तनात ||७||

☆

© श्री आशिष  बिवलकर

दि. 05 जून 2025

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कसरत ही जीवघेणी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कसरत ही जीवघेणी…  ?  सुश्री नीलांबरी शिर्के ☆

☆

तोल सावरीत कसे बसावे

आधारास्तव कुठे धरावे

भीती वाटते पडेन घसरून

बाबा तुम्हास हे का न कळावे!

*

इवल्या गाडीवर एवढा बोजा

मागे चिमुकला देह हा माझा

कसरत माझी जीवघेणी ही

का करावी असली ये जा!

☆

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य  ☆ वटपौर्णिमा भाग्याची… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? वटपौर्णिमा भाग्याची… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

☆

वटपौर्णिमा भाग्याची 

वटसावित्रीचा सण 

सावित्रीची पूजा केली 

सत्यवानाचे स्मरण

*

नका तोडू फांदी कोणी 

वडराजाची पूजेला

भाव ठेवावा पवित्र

प्राणवायू् त्याने दिला

*

त्याचे संवर्धन करू

वनराई वाढवून 

कसा कोपेल निसर्ग 

चैतन्य सारे पाहून 

*

आज वटसावित्रीला 

एक संकल्प करूया 

झाड वडाचे लावून 

वनराईला भरुया 

*

माझ्या घरादारासाठी 

प्राणवायू फार मोठा 

झाडे वेली घनदाट 

मग नाही काही तोटा 

*

वटपौर्णिमेला आज 

मागणे मला हेच दे 

निसर्गाची कृपा आणि

शांती समृद्धी नांदू दे 

☆

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अरे धाग्या ऐक ना… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “अरे धाग्या ऐक ना…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 ☆

अरे धाग्या ऐक ना..

कृतज्ञ आहे रे मी तुझी 

बाहेरील अग्नी घेऊन,

तू प्रज्वलित झालास….

प्रकाश देण्याची माझ्यातील क्षमता,

तुझ्यामुळेच तर फळाला आली,

मनोमन सफल झाली रे….

स्वतः जळून तू निघून जातोस, संपतोस,

मी मात्र वितळून आकारहित होते

पण टिकून राहते रे दरवेळी….

दूसऱ्या धाग्याच्या शोधात आकार घेण्यास सज्ज..

तुझ्याशिवाय माझा उपयोग तो काय..

तुझ्याविना मी अधुरी रे धाग्या..

तुझे उपकार कसे मानू 

माझं पूर्णत्व तू आहेस..!

परिपूर्ण चैतन्य तू आहेस रे

माझा भोवताल प्रकाशमान होण्यासाठी..

मला उजळण्यासाठी…

☆

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सुखाची आकाशा गवसणी… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सुखाची आकाशा गवसणी… ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

बालपणीचा काळ सुखाचा,

हलक्या फुलक्या आठवणी |

मौज मजा धमाल मस्ती सारी,

सुखाची आकाशाला गवसणी |

*

आभाळ ही वाटलं ठेंगण तेव्हा,

सुंदर स्वप्नांची उंच उंच भरारी |

छोट्या छोट्या गोष्टीत आनंद,

नव्हती कसलीच दुनियादारी |

*

काळ्या मातीत मुक्त बांगडणे,

मोकळ्या मैदानावरचे खेळ |

माळरानाची बिनधास्त सफर,

मित्रमंडळींसाठी भरपूर वेळ |

*

कैऱ्या चिंच पेरू रानमेवा,

रोज चालायची मेजवानी |

पंचतारांकीतच होत जगणं,

ऐट सारी होती राजावानी |

*

अंगावर फाटका कपडा तरी,

नव्हती परिस्थितीची लाज |

मर्यादित साधन सामुगीत,

संस्कारांनी चढवला साज |

*

दुर्मिळ होत चाललय आता सर्व,

जीवघेण्या स्पर्धेत बालकांची उडी |

हिरावून घेतलं जातंय बालपण त्यांचं,

माफ कशी करेल तुम्हां आताची पिढी?

☆

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares