मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भूलभुलैय्या… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ भूलभुलैय्या ☆ प्रा. भरत खैरकर 

खेळ संचिताचा जाणीयाला कोणी

भविष्याच्या पाटीवरी आपापली कहाणी!

 *

कवटाळावे कवेत स्वप्नांचे आकाश

भरारतांना पंखात असावा धरेचा फास!

 *

वेदनांची वर्दळ वाढता उरात दुःख घ्यावे

सांत्वनांच्या हातांनी हलके हलके थोपटावे

 *

आपणास फशी पाडतो नियंत्याचा भुलभुलय्या

पुण्याचा साठा करण्यात झिजवावी आपली काया!

 

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ कोठे शोधू… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

 

? कवितेच्या उत्सव ?

कोठे शोधू… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

(वृत्त – पतितपावन 8-8-8-2)

 

रमून गेले कशी सहज मी नवीन संसारी

जशी विरघळे साखर दुधात तशी पडल्यावरी

 *

वाटे ना मज परके कोणी मला ना सासरी

जुळली नाती अशी जशी की जन्मजन्मांतरी

 *

दीर सासरे नणंद सासू गोकुळ भरलेले

येती जाती सगे सोयरे अंगण फुललेले

 *

शेतीवाडी जमीन जुमला अमाप दुध दुभते

माणुसकीच्या आपुलकीच्या शब्दांना भरते

 *

अडी नडीला येती सारे समजून आपुले

गावाकऱ्यांचे भांडण तंटे इथे किती सुटले

 *

आता कोठे शोधू वाडा ती गाय वासरे

काळ बदलला गाव हरवला उडाली पाखरे

  

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ इप्सित… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ इप्सित… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

 येतो फिरून

मर्त्यलोकी

चक्र हे अनादी

जाण बा…

 

साधनेत रत

येते नाम ओठी

अंतीम क्षणी

तिचि गती…

 

वाटते त्वा

येणे जाणे खुंटावे

म्हणोन प्रभूला स्मरावे

श्वासागणिक…

 

करिता यत्ने

होशील एकरुप

इप्सित फलद्रूप

पावे परमधाम…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सीतामुडी किती निराळी… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सीतामुडी किती निराळी… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सरसर पाऊस येताना 

झरझरती रेशीम धारा

आंबा फणसावर फुलतो 

मनमोही सुखद नजारा

लतिकेने वृक्षावरती 

गजराच माळला भासे

सीतावेणी लडिवाळे

जणू हळूच खुदकन हासे 

 *

 गुलबिल्या अंगाची ही 

 श्वेतांगीशी फुलवंती 

 गजऱ्यात हिच्या रुपाची

 किती लाभलीच श्रीमंती

 *

आमरी म्हणती हिज कोणी

सीतामुडी किती निराळी

पानसकोळी ही सुंदर 

कोकणात हिची झळाळी

 *

द्रौपदी माला सजलेली

गजऱ्यात फुले ही शंभर

चिमणी श्वेतांगी सुमने

जांभूळली त्यावर झालर

 *

किती भाग्यच या वेणीचे

प्रेमाचे प्रतिक झाली

कुंतली माळता तिजला

मग नवी झळाळी ल्याली

 *

किती सुगंध गोजिरवाणा

मन माझे पिंगा घाली

शब्दांची फुलपाखरणी

कविता जन्माला आली

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – मनमुक्त मी – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

? – मनमुक्त मी…! – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सुख स्वप्नांचे रंग मी

अंगावर पांघरले 

फुलपाखरांचे थवे 

सभोवती अवतरले ||

*

स्वप्नांची फुलपाखरे 

मनी रुंजी घालतात 

मनावरती हलकेच 

मोरपीस फिरवतात ||

*

आनंदी घराची मी 

सिद्धहस्त स्वामिनी 

गृहसौख्य फुलविणारी 

गृहदेवता भामिनी ||

*

मी सौंदर्याची राणी 

आत्मानंदात रमते 

माझे आत्मतत्त्व मी 

मनमुक्ततेत जपते ||

*

मी देवाची निर्मिती 

मी निर्मितीची खाण 

सुख स्वप्नात सुद्धा 

नसे कशाची वाण ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३११ ☆ पानगळ… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३११ ?

पानगळ ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आता सुरुच झाली ऐकलेली पानगळ

कित्येक दिवसांची रोखलेली पानगळ

 *

हिर्वा ऋतू आला अंगणाच्या आतही

दिसली जरा उशिरा सांडलेली पानगळ

 *

 तो एकटा तीही एकटी या जीवनी

कोणास सांगे हे बेतलेली पानगळ

 *

 होतास तू तेव्हा कोणत्या रूपात रे

देवा तुझ्या दारी योजलेली पानगळ

 *

पानगळ होताना सावल्यांनो शांत व्हा

पाहून घ्या आता झोपलेली पानगळ

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वाढदिवस तुमचा आमचा… ☆ स्वाती विकास गाडेकर ☆

स्वाती विकास गाडेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ वाढदिवस तुमचा आमचा... ☆ स्वाती विकास गाडेकर ☆

वाढदिवस, वर्षातून एकदा येणारा सण..

साजरा करावा तुम्ही, मी आणि आपण!!

 *

दुःखाला, द्यावा थोडा विराम..

बालपणाच्या आठवणी, आठवून करावा आराम!!

 *

येतो आपण एकटे, जातोही एकटे..

परंतु जीवन जगू नये, जसे धरतीवरील गारगोटे!!

 *

ऋण फेडावे, जन्मदात्या मातापित्याचे..

त्याबरोबरच, आपुल्या निसर्ग देवतेचे!!

 *

आयुष्य असते, आपुले थोडे..

समाजास भरभरून, असेल त्यातील द्यावे!!

 *

धमाल मस्ती, करावी दणादण..

जमवावे मित्र, परिवार आणिक आप्तगण!!

 *

साजरा करावा, आनंद बाके..

जीवन आपुले, असे थोडके!!

 *

आनंदाचा क्षण टिपावा..

जीवनाचा पळ अन् पळ लुटावा!!!!

 

© स्वाती विकास गाडेकर

ए१०२, गगनगिरी सोसायटी, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई, ४००७०३

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्ञानांकुर… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ ज्ञानांकुर... ☆ श्रीशैल चौगुले ☆

ज्ञानेश ज्ञानीयाचा अंकुर

तेवे दृष्टी आभाळी कुर्पुर ||

चैतन्य भरोनीया आत्मीए

भक्ती दृढ देवलोकी दुर ||

 *

आकांक्षा अलौकिक ज्ञानीया

गीता श्लोक ज्ञानेश्वरी स्तर||

 *

स्पंद बनोनीया महामंत्र

ओम् तत् सत् विश्वात स्वर||

 *

धन्य भगवंत थोर संताशी

संजीवन समाधी चरा-चर ||

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आयुष्याच्या संध्याकाळी… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आयुष्याच्या संध्याकाळी... ? श्री आशिष  बिवलकर ☆

आयुष्याच्या संध्याकाळी,

ही भिंत फक्त आड आहे |

सरले कित्येक ऊन पावसाळे,

तुझी माझी मैत्री जीवापाड आहे |

*
दोन घरात, दोन अंगणात,

या भिंतीची आडवी रेष आहे |

गात्र जरी थकलीत आपली,

एकमेकांच्या ओढीचा आवेश आहे |

*

उभ्या असलेल्या भिंती पलीकडे,

तुझ्या मैत्रीचा तो विरंगुळा आहे |

हितगुज करतानाचा तुझा माझा,

आठवणींत रमण्याचा नाद खुळा आहे |

*

अवघाची संसार हा केला,

सुखी समाधानी परिवार आहे |

भरल्या ताटावर जरी बसलोत,

खेळीमेळीचे उरले दिवस चार आहे |

*

डोळे जरी पैलतिरी लागलेत,

समवयस्क म्हणून आधार आहे |

पिकलं पान कधी पण गळेल,

हा समज तुझ्यामुळे निराधार आहे |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ समाधान ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? समाधान ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

कोवळी किरणे उन्हाची

पडती पिल्लांच्या अंगावरी,

अंग जणू शेकत बसली 

“दोस्ती मधल्या” कट्ट्यावरी!

*

मधेच थांबवून शेपटीसवे

त्यांचे खेळण्याचे चाळे,

पाहती टकामका मजकडे 

मोठे करून घारे डोळे!

*

बहुदा गेली असेल आई 

भक्ष शोधण्या दारोदारी,

वाट पहात तिची बसली 

खेटून एकमेकां शेजारी!

*

पोज मज दिली छानशी 

विषय मिळाला कवितेला,

लिहिता त्यावर चार ओळी 

झाले समाधान मनाला!

झाले समाधान मनाला!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares