श्री प्रमोद वामन वर्तक 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? लावा एक पणती! ? श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

राख झाली क्षणात लाखोंची

नाही फिकीर पर्यावरणाची,

वृद्ध, आजारी असतील कोणी

का काळजी करा कोणाची?

*

मोल नसलं हौसेला तरी

थोडंतरी समाजभान ठेवा,

ज्या घरी नाही लागत पणती

त्यांची तरी आठवण ठेवा!

*

साध्या कंदील रोषणाईने 

होते बघा दिवाळी साजरी,

मदत करून गोर गरिबांना

हास्य आणा त्यां मुखांवरी!

*

गडबडीत या दीपोत्‍सवाच्‍या

लावा पणती त्‍यांच्‍यासाठी,

नका विसरू शूर सैनिकांना

जे रक्षितात सीमा देशासाठी!

जे रक्षितात सीमा देशासाठी!

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted