मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कवडसा… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “कवडसा…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 

या मोकळ्या आभाळाचे

शब्द तुझ्या ध्यानी आहे..!

*

या नभातल्या चांदण्याचे

तेज तुझ्या नयनी आहे!

*

या क्षणाच्या आनंदाचे

उमज तुझ्या मनी आहे

*

अंतर मनातील लाटांचे

बोध तुझ्या हृदयी आहे !

*

स्नेह-दर्पणाचा कवडसा

जर तुला प्रकाशित आहे ?

*

मग हर्ष-शोक हिंदोळ्याचे

गुपित तुला कळले आहे.

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तयात वेगळाल्या छटा… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? तयात वेगळाल्या छटा… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

मुळे यांची जमिनीखाली

जमिनीच्या वरती वाढ

वेगवेगळे पान आकार

वेगळे असे प्रत्येक झाड

*

फुलरंग पिवळेच तरी

तयात वेगळाल्या छटा

आकार फुलांचे वेगळे

मनमोहक गंधांच्या लाटा

*

वंश एक जातही एकच

एक सर्वांची गंध कुळी

एकतरी जवळी असावा

सकाळ असो वा सायंकाळी

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बोल ना गं अबोली… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बोल ना गं अबोली…  ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

बोल ना ग अबोली माझ्याशी जरा

नाजूक साजूक तुझा नखरा

*

नवरीसाठी तुझा खास गजरा

माहेरचा मान तुला आहेच खरा

*

चार रंगाची चांदणी खुळी

मऊ मुलायम तुझी पाकळी

*

गुलाबी हिरवी अबोली पिवळी

वाऱ्यावर डुलते सोनसळी

*

नाव तुला शोभते फटाक्याचे फुल

कदंबे विणताना मना पडे भूल

*

कागड्याची फुले मोगऱ्याच्या संगे

दुरंगी विणताना अबोली रंगे

*

परसात तुझे ताटवे फुलती

वैद्याचे गुण अंगी केवढी महती

*

बालपण हसले तारुण्य रुजले

तुझ्या संगती जीवन सजले

*

शब्द आज माझे झाले दिवाणे

अबोलीसाठी हे काव्य नजराणे

*

कविता सजली पानात रुजली

कुंतल सजवून ती कुजबुजली

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पूर्वज… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पूर्वज… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

गणेश विसर्जन झाले

पूर्वज सगळ्यांचे भेटीला आले

*

पंधरा दिवस पूर्वजांच्या नावाने

पिंड घालणे, चांगले चुंगले खाणे

कावळ्यांना महत्व देणे

वर्षभर का मग दुर्लक्षिलेले

पूर्वज सगळ्यांचे भेटीला आले

*

पूर्वज होते तेव्हा केली का हो सेवा

उलट पदोपदी प्रार्थना लवकर सोडव रे देवा

कावळ्यांना तरी कधी देता का मेवा

नकोत त्यांना भाव नुसते दाखवलेले

पूर्वज सगळ्यांचे भेटीला आले

*

आता तरी ऐका  म्हणणे त्यांचे

हेच पंधरा दिवस पुन्हा सान्निध्याचे

माना की हे दिवस पण पुण्याईचे आशीर्वादाचे

अशुभ का समजता या पंधरवड्यातले

पूर्वज सगळ्यांचे भेटीला आले ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आत्मचिंतन… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आत्मचिंतन…? श्री आशिष  बिवलकर ☆

राहिला केर काढायचा,

काळजाला किती कोपरे |

शोधत त्यात स्वतःला,

आपल्या घरात आपणच उपरे |

*

शुचिर्भूतता दाखवता दाखवता,

आतून छळते ती मलीनता |

दाखवायचे आणि खायचे,

यातच मानते ती धन्यता |

*

तिमिर सारता सारता,

दिव्याखाली लपतो अंधार |

चमचमत्या पदराला,

सलते टोचणारी किनार |

*

चढवित एक एक मुखवटे,

खरा चेहरा हरवून जातो |

एकांताच्या दर्पणात पाहता,

आपणच विन्मुख होतो |

*

परमार्थ साधता साधता,

न कळत चिकटतो स्वार्थ |

धर्मरक्षणाच्या रणांगणावर,

सगेसोयरे यात अडकतो पार्थ |

*

अंतरात्म्यातला श्रीकृष्ण,

पदोपदी गीताच सांगत असतो |

कर्तव्याच्या पुण्यपथावर,

मोहपाशात आपणच फसतो |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मौन… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “मौन…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 

सोबत असे तरी, स्वप्नी येतेस तू

स्वप्नातही मौन का धरतेस तू?

*

असेल तुला बोलायचे मनातले

अबोला कधी कुठे सोडतेस तू?

*

अमाप व्यग्रता तुला कर्तव्यातले

गंध फुलांचा कसे एकवटतेस तू?

*

जबाबदारीची अगणित फुले काटे

उन्हाळे सक्षमतेने कसे पेलतेस तू?

*

अमाप रंग तुजपाशी फुलपाखरांचे

किती काटेरी झूल पांघरतेस तू !

*

विषय अनेक स्पर्श वाटती तोकडे

किती सांगोपांग जगणे रचतेस तू !

*

तृप्त जरी वाटे,ओठांवरील हसणे

विपत्तीत नभाशी, मैत्री करतेस तू

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आई गं आई… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल  ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आई गं आई… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

आई गं आई

एवढी का तुला घाई

पावसात हात धरून चाललीस तरातरा

मनी भूभू भिजतय बघ ना तू जरा ||

*

ज्ञानेश्वरांचे पसायदान तूच तर शिकवले

भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे सांगितले

मग मला या दोघांशी मैत्री करू दे

माझ्या छत्रीत दोघांना घेऊ दे ||

*

आता नको म्हणू मस्तीखोर

अगं मीच तुझा ना चित्तचोर

बघ तू माझे मित्र आपल्या बरोबर राहतील

पसायदान ते पण शिकतील ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ त्याच त्याच रोज | मरणयातना || ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? त्याच त्याच रोज | मरणयातना || ? श्री आशिष  बिवलकर ☆

राज्यकर्ते करी | स्वतःचीच लाल |

जनता बेहाल | रस्त्यावर ||१||

*

त्याच त्याच रोज | मरण यातना |

प्रश्नच सुटेना | ट्राफिकचा ||२||

*

तासोंतास चाले | वाहतूक कोंडी |

जीव रडकुंडी  | प्रवासात ||३||

*

ट्राफिक पोलीस |  करे मनमानी |

गाड्या आडवुनी | जैसी मर्जी ||४||

*

मंत्री संत्री ताफा | पळतो सुसाट |

जनतेचे वाट | लावोनिया ||५||

*

रोड टॅक्स टोल | सर्रास वसुली |

जनता मामुली | सत्तेपुढे ||६||

*

एकमेकांचीच | खेचा तुम्ही टांग |

वाहनांची रांग | आम्हां भाळी ||७||

*

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तू असतांना.. तू नसतांना… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “तू असतांना.. तू नसतांना…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 

एकटीच मी बरी वाटे तू असतांना

उगाच का विरह दाटे तू नसतांना?

*

सततची धांदल वाटे तू असतांना

उगाच का निरव साचे तू नसतांना?

*

अधीर मी पुस्तक वाचण्या तू असतांना

पानोपानी तुझी प्रतिमा तू नसतांना?

*

स्वच्छंदीचा ध्यास मज, तू असतांना

उगाच का भयाण भासे तू नसतांना?

*

चहाचा मी आग्रह धरी तू असतांना

कॉफी तुझी का प्रिय वाटे तू नसतांना?

*

अंधार निमाला, किरणे प्रकाशतांना

पाने हसली तुझी चाहूल लागतांना..

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जीव केवढा.. काम केवढे..? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? जीव केवढा.. काम केवढे..? ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

वाहक युक्ती वाहन युक्तीला

पोलीसही करी सलाम

दोन चाकी इवल्या वाहना

लावलेस हे केवढे काम

*
जीव केवढा या वाहनाचा

त्यावर आरूढ कैक जणांचा

विचार करावा बसणारांनी

श्वास कोंडला असेल त्याचा

*
उतरा खाली सारे सत्वर

सत्कारच मी करतो तुमचा……

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares