मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पंचदली रानभेंडी… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पंचदली रानभेंडी… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

 भावगीत : (वर्ण संख्या १४ यति ८ व्या अक्षरावर) 

☆

गुलबिल्या पाकळीत श्वेतांगी देखणी 

पंचदली रान भेंडी नक्षत्र चांदणी ||ध्रु||

*

हेमंताच्या थंडीमध्ये फुलारून येते

जणू सारे चैतन्यच निसर्गाला देते 

मोह घालीते मनाला पर्णांच्या गोंदणी

पंचदली रान भेंडी नक्षत्र चांदणी ||१||

*

श्वेतरंगी पाकळ्यात जांभळी टिकली

हिंदोळते वाऱ्यासवे पाकळी पाकळी

दुरूनच पाहू फळे काट्याची टोचणी

पंचदली रान भेंडी नक्षत्र चांदणी ||२||

*

रानीवनी उगवते रंग किती छान 

काव्यमोती जडवून देते हिला मान 

कवितेत आली माझ्या ही लावण्यखणी 

पंचदली रानभेंडी नक्षत्र चांदणी ||३||

☆

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आणखी अंत नको रे पाहूस ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आणखी अंत नको रे पाहूस ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

कोरडाठाक चाललास मृगा,

कुठं विसरलास रे पाऊस?

ओढ दिली आहे सरिंनी,

अंत नको रे बाबा पाहूस |

*

काळे काळे ढग दिसेना,

ना चातक देई ती वर्दी |

गंध सुटेना मातीला अजून,

आभाळात ढग करेना गर्दी |

*

सुकलेत नदी नाले पाणवठे,

ओलावते फक्त डोळ्यांची कडा |

दहा दिशा पाण्यासाठी वणवण,

रिताच राहिला कमरेवरचा घडा |

*

गुर ढोरं झालीत व्याकुळ,

कोरडा पडला धेनूचा पान्हा |

मागल्या वर्षी आलास लवकर,

यंदा काय झाला आमचा गुन्हा |

*

तहानलेली आहे काळी आई,

ठिपूस ना उरला तिच्या उदरात |

मनसोक्त बरस ना रे पावसा,

दान टाक वरुण देवा पदरात |

*

धोंडी धोंडी पाणी दे,

बेडका लगीन थाटात लावतो |

श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा,

देवा मागणं पावसाच रे मागतो |

©️ वास्तवरंग

☆

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सुखी निद्रा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सुखी निद्रा! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

गाढ झोप तुझी माझी 

‘त्यानेच’ नशिबी लिहिली,

जरी होतसे उकाड्याने

साऱ्या अंगाची काहीली !

*

येईल कशी आठवण 

उदरातल्या आगडोंबाची,

भरतो स्वप्नातच खळगी 

भाकर तुकड्याने पोटाची !

*

जगूया उद्याच्या आशेवर 

मिळावे कोरड्याचे घास,

जगावे तर लागेल दोघां 

असेपर्यंत शरीरात श्वास !

असेपर्यंत शरीरात श्वास !

(चित्रकार – अनिल खरे, मिनिआपोलीस, USA)

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ रिंगणी भुईरिंगणी… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? रिंगणी भुईरिंगणी… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भावगीत: वर्ण संख्या १६ यती ८ व्या अक्षरावर) 

☆

शुभ्रखणी जांभूळली अवनीच्या गं अंगणी 

काटेदार जाळी तुझी रिंगणी भुईरिंगणी ||ध्रु||

*

नागमोडी चाल तुझी खोडावर काटेकुटे

पानावर हिरव्याशा देखणी कलिका फुटे

शुभ्रकांती मनमोही भासते जणू चांदणी

काटेदार जाळी तुझी रिंगणी भुईरिंगणी ||१||

*

फुले जांभळी पांढरी कनकाचा वर गोंडा

देखण्याशा रुपावर मधमाशांचा गं लोंढा

तुला चिचुर्डी म्हणती कुणी डोर्ली भोरिंगणी 

काटेदार जाळी तुझी रिंगणी भुईरिंगणी ||२||

*

अनेक रूपात तुझी नावे वेग वेगळाली

फुलाफळांसह फांदी बहराला पहा आली

वैद्य तू बहुगुणी पान, फूल, खोड, चणी

काटेदार जाळी तुझी रिंगणी भुईरिंगणी ||३||

*

कतेली कताई आणि निदिग्धिका, कंटकारी

नागमोडी चाल तुझी रानीवनी दिसणारी 

करतात सारे तुझी भाजी, आमटी, चटणी 

काटेदार जाळी तुझी रिंगणी भुईरिंगणी ||४||

*

पावसात बहरते कटेरी तू कंटकारी

काटे रिंगणी गं बाई नावे तुझी किती सारी

रानरिंगणी म्हणती तुला गं मोतीरिंगणी

काटेदार जाळी तुझी रिंगणी भुईरिंगणी ||५||

☆

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ इथे ओशाळली माणुसकी! ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? इथे ओशाळली माणुसकी ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

माणुसकी ओशाळली,

संस्कार ही थिजले |

वयाची ही न जाण,

अधिकारी हे कसले |

*

वृद्ध कष्टाळू माऊली ती,

नियम कायदा नसे माहित |

रस्त्यावर विकून भाजी,

सोडवी पोटापाण्याचे गणित |

*

कर्तव्यदक्ष धृतराष्ट्र पालिकेचे,

न दिसली तिच्यात त्यांना आई |

कारवाईचा बडगा कठोर ऐसा,

नासधूस सारी, कशाची ही घाई |

*

गाडीत गॉगल लावून साहेब,

गोरगरिबांच्यावर नुसता रुबाब |

घरात नसेल म्हातारी आई त्याच्या,

श्रीमुखात देऊन विचारावा जाब |

*

अतिक्रमण हटाव मोहिमेत,

सगळीकडे चालतो दुजाभाव |

चिरीमिरी, हप्ते वसुली सर्रास,

परप्रांतीयांसाठी चाले धावाधाव |

©️ वास्तवरंग

☆

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गजरा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? गजरा! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

काळ सारा उमेदीचा

कष्ट करण्यात सरला,

हवा होता जेंव्हा तुला

गजरा नाही माळला!

*

 हौस मौज सारे काही 

 मी बासनात बांधले,

 करून संसार टुकीने

 कुटुंबाचे हित साधले!

*

कधी न करता कुरकुर

दिलीस आनंदाने साथ,

आज माळतांना गजरा

थरथरतो माझा हात!

*

 नसतीस तू साथीला

 होता खडतर प्रवास,

 साथ मिळो सातजन्मी

 ही प्रार्थना परमेश्वरास!

 ही प्रार्थना परमेश्वरास!

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ही जिवतीची पणती… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ही जिवतीची पणती… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

☆

रानात दिसती वेलीत हसती

रानभाजीची फुले 

नाजूक चांदण्या देखण्या देखण्या 

पाहून मन माझे खुले

*

पावसाच्या सरीत वारा भिरभिरित

वेलींवर हिंदोळे घेती

झुपक्यात देखणे फुले नजराणे

चैतन्य जणू हे देती 

*

जंगलची राणी किती देखणी

चवीला रुचकर मेजवानी

फुलांना खुडता झिरमिर येते

झिरमिर पावसाचे पाणी

*

डुडी कुणी म्हणती हिला 

झटुलीही म्हणती

झुटेल, दवडी आणि

शेरी म्हणून गणती

*

दाटी वाटी किती हिची 

हिरव्या बदामात बाई

पर्णपाती दाट किती

गगनाला उंच जाई 

*

शुभ्रांगी दिसते कधी

कधी हसते पोपटली 

ओंजळ भरून घेता

गोरी गोरी दिसते कळी

*

दीर्घायु वेल असे

आदिवासी मान देती

जिवतीची पणती ही

आरोग्य देणारी खाशी

☆

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अंतिम क्षण मातृत्वाचे… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ अंतिम क्षण मातृत्वाचे… ☆ श्रीशैल चौगुले ☆

☆

गंगेच्या कुशीत सुखावले

माय-लेकरु दैवगतीचे

कसा जिव्हाळा एक जाहला

अंतिम क्षण मातृत्वाचे.

*

नाही कसले दुःख अपार

भाव जन्माचे शांत-शांत

हृदय बंद-जिवंत आत्मा

पुण्य म्हणावे का एकांत.

*

आक्रोश न कसला जीवाचा

प्रारब्ध भोग मानवलोकी

मातेची माया कशी कळावी

निष्पाप लेकरू मृत्यूनौकी.

☆

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ प्रचंड धग!! ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? प्रचंड धग!! ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

नीट पेपरफुटीची धगच इतकी,

शिक्षण मंत्रालयाला लागली आग |

बेचिराख झाले आता सर्व पुरावे,

भाग रे बाबा.. अब तू भाग |

*

जिथे जिथे संशयाची सुई जाते,

तिथे तिथे आग कशी काय लागते |

भ्रष्ट व्यवस्थेवर प्रसन्न होऊन,

अग्निदेवता त्यांच्या नवसाला पावते |

*

फायर ब्रिगेड एनओसीसाठी,

नागरिकाना कडक नियम लावतात |

मंत्रालयाला मात्र आग लागते,

मोठी धेंडगं सहीसलामत वाचतात |

*

स्पर्धा परीक्षा शिक्षणाच्या बाजारात,

खासगी इंटीग्रेटेड क्लास झाले अड्डे |

बंद करा कॉलेज शाळा सर्व आता,

सरकारी अनुदानाला नकोयत खड्डे |

*

शिक्षण व्यवस्थेच्या आयचा घो,

तर केव्हाच तो झालाय |

पाल्यांच्या फिया भरून भरून,

मध्यमवर्गीय पुरता मेलाय |

*

राईट टू एज्यूकेशन,

आहे फक्त ते मिरवायाला |

वाईट केलीय सिच्यूवेशन,

सामान्यांची पुरती जिरवायला |

©️ वास्तवरंग

☆

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ झुलता झुलता… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

☆ झुलता झुलता… ☆ नीलांबरी शिर्के ☆

☆

दोघींना दिसला

रिकामा झोपाळा

फिरून फिरून

आलेला कंटाळा!!

*

म्हणाल्या एकमेकी

चला चला बसुया

झुलूनी जरासे

गंमत करूया!!

*

झुलता झुलता

गंमत वाटली

एक मनी तर

निवांत झोपली!!

*

दुजी मनी जरा

सावरून बसे

मुखावर तिच्या

उमटले हसे!!

☆

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares