Foundation, Timely बनाओ ‘STRONG’. जो चले ‘LIFE LONG’. •••
काल ताई कडे गेले होते. सध्या अनघा साठी मुलं शोधणे कार्यक्रम चालू आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी गेल्या वर नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतात. कधी आश्चर्य वाटत तर कधी राग येतो. जनरेशन गॅप म्हणजे काय?? हे दरवेळी नव्याने कळते. नवीन जनरेशन चे काही समजतच नाही. त्यांची आयुष्याची समीकरण काय आहेत?? काय विचार करतात?? . खरं तर नवीन मुलं आपल्या पेक्षा सर्वच बाबतीत हुशार आहेत. फास्ट आहेत. पण हीच जास्तीची हुशारी, गति अडते का येथे?? ••••
ते Present चा विचार करतात की फक्त Future चाच?? हे मला आजपर्यंत कळलंच नाही.??? ••••
ताई, भाऊजी, अनघाने Short list केलेल्या मुलांपैकी एका मुलाकडे ताईने फोन केला. ••••
वयात थोडे अंतर जास्त वाटत होते. पण तरीही बघूया, म्हणून ताईने फोन केला.
तर उत्तर मिळाले, •••” आम्हाला कमीतकमी पंधरा लाख पॅकेज असलेली मुलगी हवी आहे. एवढ्यावरच बोलणं थांबलं. बाकी ऐकून घ्यायची गरजच वाटली नाही. “••••
म्हणजे येथे पॅकेज महत्वाचा मुद्दा आहे तर. मग मुलगी कशीही असली तरी चालणार आहे का त्यांना?? विचार त्यांना. भाऊजीं रागानेच म्हणाले. ••••
” बघ असं आहे. ” ताई म्हणाली. •••
अग!! या मुलाचे पॅकेज चांगले चोवीस लाखांचे आहे. तरीही पॅकेज महत्वाचेच. •••
अग!! एवढ्या पगारापर्यंत पोहचायला वय तीस बत्तीस पार झालंय. आता अनघाचे दहा ते पंधरा पॅकेज व्हायला तिला ही चार पाच वर्ष लागणार. म्हणजे मुलगी पस्तीस तर मुलगा चाळीशी पार करेल. मग लग्नाचा विचार करायचा का?? ••••
” अजून अजून च्या चक्कर मध्ये वय वाढलं तरी चालेल पण समझौता करायला काही कोणी तयार नाही. “ताई रागानेच बडबडत होती. ••••
खरंतर एकाच्याच पगारात घर अगदी मस्त चालू शकत. म्हणजे अगदी सर्व आधुनिक सुखसोयी enjoy करू शकतात. ऐटीत राहू शकतात. ••••
फक्त श्रीमंती ची / व्याख्या थोडी बदलली तर. Rat Race पासून स्वतः ला सांभाळले तर. तुलना करणे बंद केले तर. ‘Social status’ पेक्षा स्वतः च्या भवितव्याचा विचार केला तर, अनेक दुसरे सरळ, सोपे मार्ग दिसतील. ••••
महागडा मोबाईल, महागडी कार, दोन चार करोडच्या घराकरिता लोन घेणे व ते फेडत बसणे. त्यापेक्षा थोडा वेगळा विचार केला तर हे सर्व बायको मुलांबरोबर राहून आनंदाने जगता येईल. पूढे जसं जसं जमेल तसं करता येईल. कर्जाचा भारही डोक्यावर नसेल. सध्या ची परिस्थिती बघता नोकरी टिकविणे ही कठीण झाले आहे. स्ट्रेस कमी राहील. रोज नऊ दहा तास काम केल्यानंतर ट्रॅफिक मधून थकून भागून घरी आल्यावर बायको मुलाला बघून आनंद मिळेल. ••••
‘आनंद’ वयानुसार वर्तमान काळात घ्यायची गोष्ट/गरज आहे. हे एवढं झालं, की मी मजा करेन. असा विचार करण चूकच आहे. आणि हे ‘एवढं’ म्हणजे किती?? कोणत्या cost वर?? हा विचार करणेही महत्त्वाचे. कुठे थांबायचे?? हे ही वेळेवर ठरवता आले पाहिजे. किती श्रीमंत व्हायचय??? हेही नक्की ठरवता आलं पाहिजे. ••••
“श्रीमंतीची Perfect व्याख्या आजपर्यंत कोणाला करता आलेली नाही. “•••
बरं, वीस लाखांची कार घेतल्यावरही तुमच्या घरासमोर पन्नास लाखांची BMW असणारी दुसरी व्यक्ती असतेच. म्हणजे कुठे तरी थांबावच लागत. वेळेवर फुल स्टाॅप नाही तरी कॉमा (, ) द्यावाच लागतो. मग आधी का नाही?? हा विचार करण्यासारखा चर्चेचा विषय आहे. ••••
योग्य वयात सर्व व्हावं असं प्रत्त्येक आई वडिलांची इच्छा असते. आपली जबाबदारी त्यांनाही वेळेवर पार पाडायची असते. म्हातारपणाच्या काही इच्छाही असतातच. •••
फक्त पॅकेजच महत्वाचे का?? तर असं नाही. मुलगी सुरेख असली पाहिजे. गोरी उंच म्हणजे तेथेही तडजोड सहज करत नाहीच. ••••
हे असे विचार बदलायची गरज आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी उपाय शोधणे आवश्यक आहे. खरं तर निसर्ग/ प्रकृती आपल्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न करत असते. पण आपण सोईस्कर पणे त्याकडे दुर्लक्ष करतो.
कोरोनाने सर्व गोष्टी छान समजविल्या आहेत. ••••
आयुष्याची सरळ सोपी व्याख्या सांगितली आहे. ••••
“जास्त कपड्यांची गरज नाही. पैशा पेक्षा Health महत्वाची. कमी खर्चातही घर चालू शकत. नोकरीचा भरवसा नाही. जीवाची शाश्वती नाही. तेंव्हा हातात असलेला प्रत्येक क्षण जगून घ्यावा. सोबत महत्वाची. अगदी पन्नास पाहुण्यांच्या उपस्थितीत दोन तासात लग्न होऊ शकते. बाकी लग्ना संबंधीत सर्व खर्च/ कार्यक्रम म्हणजे आपले शौक असतात. एकमेकांना बघून ते वाढत आहेत. काय आवश्यक काय अनावश्यक हे छान कळलंय. ••••
” कळत पण वळत नाही व मनात जास्त दिवस टिकत तर नाहीच नाही. ” हाच मोठा प्रोब्लेम आहे. ••••
खरं तर विवाह संस्था हे काम करू शकतात. भावी वर वधू जेंव्हा त्यांना approach करतात तेंव्हा तेथे त्यांचे counselling करणे गरजेचे आहे. कदाचित ते करतही असतील. व्यवसाया बरोबर समाजाची सध्याची परिस्थिती बघता त्यांना त्यात बदल आणणे शक्य आहे. •••••••
Pre wedding shoot बरोबर Post wedding responsibilities ची समजही द्यावी / असावी/ ठेवावी. •••
प्रत्येक महिन्याला वर वधूंना त्यांच्या फॅमिली सोबत experts, psychologist, च्या उपस्थितीत, उपदेशाचे दोन शब्द सांगणे आवश्यक आहे. लग्न म्हणजे मुला मुलींबरोबर घरच्यांची जबाबदारी, कर्तव्य, limitations ही आवश्यक आहे. बंधन व आपली लिमिट, कुठे रेघ ओढायची?? हे प्रत्येकालाच समजले पाहिजे. ••••
खुला मंच उपलब्ध केला पाहिजे. जेथे मनात दडलेले प्रश्न, शंका, भीती यांना वाचा दिली पाहिजे. नवीन व जुन्या पिढीतील गॅप कमी झाला पाहिजे. मोठ्ठा फॉर्म भरून घेण्यापेक्षा त्याच प्रश्नांवर खुली चर्चा होणे गरजेचे आहे. लग्नाची सुरवात भीतीने नाही तर विश्वासावर सुरू झाली पाहिजे. ••••
तसेच वर्ष दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या व सुखाने संसार करणार्या जोडप्यांना बोलवून त्यांच्या कडून त्यांच्या सूखी संसाराचे गुपित / रहस्य त्यांच्या तोंडून नवीन मुलामुलींना सांगावे. त्यांनी लग्न करताना काय विचार केले?? कुठे तडजोड केली?? का केली?? कोणत्या सवयी लग्नानंतर बदलल्या?? वगैरे वगैरे. ••••
अशीही उदाहरणे आपण बघतो जेथे दोघेही उच्च शिक्षित, लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या असलेले जोडपे एकमेकांच्या सोई बघून स्वतः दोन पावलं मागे राहून, एकमेकांना उत्तम साथ देतात. सुखाचा संसार करतात. ••••
तसेच छोट्या कारणांवरून घटस्फोट झालेली उदाहरणे तज्ञांनी सांगावी. •••
लग्नाआधीच जास्तीत जास्त असे प्रयत्न केले तर कदाचित मन/मत परिवर्तन होईल. कुठे तरी सुरवात करायची गरज आहे. •••• भांबावलेल्या अनेकांना मदत मिळेल.
संवाद, नातेवाईक, ओळख, सोशल मिडिया, मित्र मंडळी, सवयी, पैसा, परिवाराच्या सोबतीचे सामर्थ्य, स्थिरता, वाढणारे वय, सवयी, मद्यपान, स्मोकिंग नोकरी, करियर, रिसेशन, investment, stress फॅमिली सपोर्ट, अपेक्षा, सोशल स्टेटस, live in relationship, अमाप shopping, असे अनेक मुद्दे डिस्कस करणे गरजेचे आहे. मुलांना त्यांच्या भविष्याची झलक दाखविणे गरजेचे आहे. •••
आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपण ठरवतो तशीच होते असं नाही, कधी कधी त्या गोष्टी होतात ज्या कधी आपण ठरवतही नाही. हा विचारही मनात असावा. ••••
श्रेष्ठतेचा /श्रीमंती चा मापदंड पैसा पोझिशन असला तरी तुम्ही वयाप्रमाणे वेळेवर घेतलेले योग्य निर्णय तुमच्या जगण्याचा आनंद वाढवतात. समाजात आदर मान मिळतो. ••••
Ideal couple पेक्षा आनंदी couple असावे. म्हणजे सर्व सुखाचे क्षण enjoy करता येतात व दुःखाचे सहज निघून जातात. कोरोना सारखा महामारीचा लांबलचक काळ ही पार पडतो. ••••
आनंदी समाधानी परिवार समाजाचा भक्कम पाया तयार करतो. ••••
“श्रीमंत होण्यात आयुष्य जगायचे राहुनच गेले” ही वेळ न यावी. ••••
आपल्याच हाताची पाची बोटं एकसारखी नाही पण सर्व मिळुन प्रत्त्येक काम किती व्यवस्थित करतात. तसाच विश्वास आपल्या पार्टनर वर असावा आपण दोघे मिळून सर्व सांभाळून घेऊ. Perfect 10 कधी काहीच नसतं. ••••
“तुमची मिळकत तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी पर्याप्त असेल तर तुम्ही स्वतः ला श्रीमंतच समजा “. ••••
खरं तर आयुष्याची गणितं बोटांवर सोडविण्याइतकी सोपी असतात पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ, तुलना, कधीच न संपणारी रेस मध्ये भाग घेतला की, आधुनिकता आणि स्मार्टनेस च्या नावाखाली मी काही ही करू शकते हा (चुकीचा) समज असला तर आयुष्याचा अख्खा हिशोब चुकतो. ••••
फक्त एकच वाक्य लक्षात असावं
म्हणतात ना, •••••
“Foundation, Timely बनाओ strong, जो चले life long. ” •••