श्री अनिल वामोरकर
चित्रकाव्य
तूचि पालनहार खरा… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
उदयाचळी पूर्वेला
दर्शन तव घडते
सर्व जीवांचे
तम विलया जाते…
सृष्टीचे संतुलन
तूझ्याच मुळे राही
नवचैतन्य चराचरी
तूझ्याच मुळे येई..
तूझ्याशिवाय
सृष्टीची कल्पना
विदारक होय,
जसे शरीर आत्म्याविना..
रहाटगाडगे सृष्टीचे
तूच चालविशी भास्करा
तूचि अरुणा जगताचा
पालनहार खरा…
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





















